Wed, May 19, 2021 04:38
सांगली जिल्ह्यात कोरोनाचे दिवसात १५७५ रुग्ण 

Last Updated: May 05 2021 2:24AM

सांगली : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात 57 जणांचा मृत्यू तर उच्चांकी 1575  जण  पॉझिटिव्ह आले. खानापूर, मिरज वाळवा, जत तालुक्यात सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. 2450 जण गंभीर झाल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. 1293 जण कोरोनामुक्त झाले.  

जिल्ह्यात आजअखेर एकूण पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या 81 हजार 486  झाली आहे.  सध्या  14  हजार 102 व्यक्ती उपचाराखाली आहेत.  आज दिवसभरात आरटीपीसीआरच्या 2322 तपासण्या करण्यात आल्या. यातील 808 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहे. तर 3457 जणांच्या अँटिजेन टेस्ट केल्या. यात 825 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. 

आज दिवसभरात कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्ती तालुकानिहाय :  आटपाडी : 167 , कडेगाव : 115, खानापूर : 238 , पलूस : 64 , तासगाव 104, जत : 203, कवठेमहांकाळ :  135, मिरज :101, शिराळा :62,  वाळवा : 219.  सांगली शहर : 85, मिरज : 82 .  

गेल्या पंधरा  दिवसांपासून मृत्यूचा   वाढत चालला आहे. आज सांगलीसह इतर जिल्ह्यातील  तब्बल 57   जणांचे बळी गेले.  आटपाडी तालुक्यात 1,    कडेगाव तालुक्यात 3,  खानापूर तालुक्यात 4,  पलूस तालुक्यात 2, तासगाव तालुक्यात 6, जत तालुक्यात 2,  कवठेमहांकाळ तालुक्यातील 4, मिरज तालुक्यातील 6,  वाळवा तालुक्यातील 2 व सांगलीतील 9 , मिरजेतील 2  अशा   41   व्यक्तींचा मृत्यू झाला. तसेच  कोल्हापूर जिल्ह्यातील 3, कर्नाटकमधील 1, सातारा  जिल्ह्यातील 3,  सोलापूर जिल्ह्यातील 7, पुणेतील 1, ठाणे जिल्ह्यातील 1 अशा  16 जणांचा आज सांगलीत उपचारादरम्यान मृत्यू झाला.  आजअखेर  जिल्ह्यातील  एकूण 2429 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. 

आज परजिल्ह्यातील सोलापूरमधून  आलेल्या 10  ,  कोल्हापूर जिल्ह्यातील 24,   सातारा   जिल्ह्यातील  6 , कर्नाटकमधील 15,  पुणे     जिल्ह्यातील 1, ठाणेमधील 1 अशा  58  पॉझिटिव्ह व्यक्तींवर उपचार सुरु आहेत.  होम आयसोलेशनमध्ये   10934  व्यक्ती आहेत.

तालुकानिहाय कोरोना पॉझिटिव्ह

 आटपाडी: 5539
 जत : 5084
 कडेगाव : 5566
 कवठेमहांकाळ : 4103
 खानापूर : 6691
 मिरज : 8067
 पलूस : 3900
 शिराळा : 3893
 तासगाव : 5869
 वाळवा : 9489
 महापालिका क्षेत्र : 23385