Sun, Aug 09, 2020 04:24



होमपेज › Pune › रोहितवर 'फोकस' करणे बंद करा, विराटचा पत्रकारांना सल्ला 

रोहितवर 'फोकस' करणे बंद करा, विराटचा पत्रकारांना सल्ला 

Last Updated: Oct 10 2019 1:40AM




पुणे : पुढारी ऑनलाईन 

भारताने विशाखापट्टणम कसोटीत दक्षिण आफ्रिकेच २०३ धावांनी दारूण पराभव केला. भारताच्या या दणदणीत विजयाचा शिल्पकार ठरला तो कसोटीत पहिल्यांदाच सलामीला नशिब आजमावणारा रोहित शर्मा. त्याने दोन्ही डावात शतकी खेळी केली. उद्यापासून (दि.१०) पुण्यात दुसऱ्या कसोटीला सुरुवात होत आहे. या कसोटीच्या पूर्वसंधीला भारताचा कर्णधार विराट कोहलीने पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्याने रोहितला जरा आता विश्रांती द्या, त्याला त्याच्या फलंदाजीचा आनंद घेऊ द्या असे वक्तव्य केले. 

विराट कोहलीने दुसऱ्या कसोटी सांमन्यापूर्वी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्याने 'रोहित बाबत चर्चा करणे थांबवावे. तो चांगली कामगिरी करत आहे हे तुम्हाला माहित आहे. त्याला त्याची फलंदाजी एन्जॉय करु द्या. ज्या प्रमाणे तो वनडेत जशी फलंदाजी करतो तशी करु द्या.' असे वक्तव्य केले. 

तसेच तो म्हणाला 'रोहित चांगल्या लयीत आहे. पहिल्या सामन्यात तो तणाव मुक्त असल्यासारखा वाटत होता. त्याचा सगळा अनुभव त्याच्या खेळीत दिसून येत होता.' विराट कोहलीने आयसीसीच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट टेबलबाबतही वक्तव्य केले जर मला विचाराल तर पुढच्या वेळेला परदेशात जिंकलेल्या कसोटीसाठी दुप्पट गुण द्यायला हवेत असे तो म्हणाला.