Wed, Aug 05, 2020 19:49होमपेज › Pune › पुणेकर बातमी आपल्यासाठी! रिक्षा, टॅक्सी आणि चारचाकी वाहनांसाठी नवीन नियम लागू

पुणेकर बातमी आपल्यासाठी! रिक्षा, टॅक्सी आणि चारचाकी वाहनांसाठी नवीन नियम लागू

Last Updated: Jul 03 2020 9:56PM

संग्रहित छायाचित्रपुणे : पुढारी वृत्तसेवा 

शहरात वाढती कोरोना रुग्णसंख्या पहाता रिक्षा, टॅक्सी आणि चारचाकी मोटारीमधून चालकासह केवळ तीन जणांनाच प्रवास करण्याची परवानगी असणार आहे. तसेच लग्न समारंभ आणि इतर कार्यक्रमासाठी ५० पेक्षा जास्त व्यक्ती जमविण्यास मनाई करण्यात आली आल्याची माहिती पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी  ट्विटरद्वारे  दिली. 

मागील काही दिवसात शहरात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्याला रोखण्यासाठी जिल्हा, पालिका आणि पोलिस प्रशासन काम करत आहे. दरम्यान अनलॉक सुरु होताच  मोठ्या प्रमाणात नागरिक बाहेर पडत आहेत. तसेच रस्त्यावर गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या देखील झपाट्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलत पुन्हा एकदा रिक्षा, टॅक्सी आणि चारचाकी वाहनांसाठी नियम लागू केले आहेत.

त्यानुसार शहरात आता रिक्षा, टॅक्सी आणि चारचाकी वाहनातून प्रवास करताना ड्रायव्हरसह तीन व्यक्तींना प्रवास करता येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सूचनांचे याचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. लग्न समारंभ तसेच इतर सार्वजनिक व घरघुती कार्यक्रमाला ५० व्यक्तीपेक्षा जास्त नागरिक जमविण्याचे बंधन घालण्यात आले आहे. अन्यथा पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी  सूचनांचे पालन करावे, अन्यथा कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. दरम्यान बाणेर औंध परिसरात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी काही दुकानदारावर कारवाई करण्यात आली आहे.