Thu, Oct 01, 2020 18:28होमपेज › Pune › अश्लील चित्रफीत दाखवून आठ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार

अश्लील चित्रफीत दाखवून चिमुरडीवर अत्याचार

Published On: Jun 18 2019 9:34AM | Last Updated: Jun 18 2019 9:34AM
पिंपरी : प्रतिनिधी 

मोबाईलवर अश्लील चित्रफीत दाखवून एका नराधमाने आठ वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार सोमवारी  (दि. १७) रात्री उशिरा उघडकीस आला. 

याप्रकरणी मुलीच्या आईने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, व्यंकटेश स्वामी ( पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

वरिष्ठ निरीक्षक सतीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी स्वामी हा पीडित मुलीच्या घरासमोरच भाड्याने राहतो. मुलगी घरासमोर खेळत असताना त्याने तिला अश्लील चित्रफीत दाखवून खोलीत नेले. त्या ठिकाणी मुलीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर स्वामी याने पळ काढला. मुलगी शाळेत गेली नसल्याने शिक्षकांनी चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला. एका शिक्षकाने याबाबत एका सामाजिक संस्थेला माहिती दिली. त्या संस्थेने मुलीच्या पालकांना धीर दिल्यानंतर सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास वाकड पोलिस करीत आहेत.