Mon, Sep 28, 2020 07:32होमपेज › Pune › पुण्यात अजित पवारांकडून लॉकडाऊन घोषित; गिरीश बापटांकडून टीकास्त्र! (video)

पुण्यात अजित पवारांकडून लॉकडाऊन घोषित; गिरीश बापटांकडून टीकास्त्र! (video)

Last Updated: Jul 11 2020 10:35PM

गिरीश बापटांची, उपमुख्यमंत्री अजित पवारपुणे : पुढारी ऑनलाईन

राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत आहे. रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही तेवढेच चांगले आहे. पण बाधीत रुग्ण वाढतच आहेत. पुण्यात रुग्ण वाढतच आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे पुन्हा पंधरा दिवस लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर भाजपचे खासदार गिरीष बापट यांनी टीका आहे.

“मास्क लावला नाही, शारीरिक अंतर पाळले नाही तर कडक कारवाई करा, पण तीन टक्के प्रतिबंधित क्षेत्रातील लोकांसाठी ९७ टक्के पुणेकरांना वेठीस का धरता? आम्ही सहकार्य करू, पण लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्या. केवळ अधिकाऱ्यांवर विसंबून राहून लॉकडाउनसारखा सोपा आणि मोठा निर्णय घेऊ नका, अशी टीका खासदार गिरीष बापट यांनी केली आहे. 

वाचा : कोंढव्यात सराईत गुंडाचा घरात घुसून खून

पुणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आढावा घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे, पिंपरी चिंचवड आणि हवेलीमध्ये १३ ते २४ जुलै या काळात संपूर्ण टाळेबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिले पाच दिवस या भागात कठोर टाळेबंदी आहे. पहिल्या पाच दिवसांत केवळ दूध वितरण तसेच औषधे दुकाने आणि रुग्णालये सुरू राहातील. वृत्तपत्रांचे वितरणही या काळात सुरू राहील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

राज्यात एकीकडे अनलॉकच्या सूचना द्यायच्या तर दुसरीकडे पुण्यासारख्या शहरात लॉकडाऊन करायचे हे कसले धोरण आहे. असा प्रश्नही खासदार बापट यांनी केला आहे.  

वाचा : बारामतीत आणखी तीन कोरोनाग्रस्त 

 "