Tue, Aug 04, 2020 10:21होमपेज › Pune › कोंढव्यात सराईत गुंडाचा घरात घुसून खून

कोंढव्यात सराईत गुंडाचा घरात घुसून खून

Last Updated: Jul 11 2020 1:35PM

घनश्याम ऊर्फ पप्पू पडवळपुणे : पुढारी वृत्तसेवा 

पुण्यात सराईत गुंडाचा घरात घुसून कोयत्याने सपासप वार करुन खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घनश्याम ऊर्फ पप्पू पडवळ (रा. कोंढवा) असे खून झालेल्याचे नाव आहे.

वाचा :  लॉकडाऊनच्या घोषणेनंतर पुणेकरांची खरेदीसाठी धावपळ

याबाबतची प्राथमिक माहिती अशी, पप्पू पडवळ हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. यापूर्वी तो कारचालक म्हणून काम करीत होता. एका टोळीकडून यापूर्वी त्याच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला होता. सध्या तो व्याजाने पैसे देण्याचा व्यवसाय करीत होता. कोंढव्यातील ब्रम्हा काँट्री बिल्डिंगमधील पाचव्या मजल्यावर तो रहात होता. गेल्या दोन दिवसांपासून तो घरात एकटाच होता. तो फोन उचलत नसल्याने त्याचे नातेवाईक घरी आले. तेव्हा घर आतून बंद होते. दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यावर तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला. 

वाचा : वाहन चोरांकडून मंदीत संधी...!

कोणीतरी घरात शिरुन त्याच्यावर कोयत्याने वार करुन त्याचा खून केल्याचे आढळून आले. ही माहिती समजल्यावर कोंढवा पोलिस घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविला आहे