Sat, Feb 27, 2021 06:12
अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या विरोधात यवतमध्ये मारहाणीचा गुन्हा दाखल

Last Updated: Jan 17 2021 9:53AM
यवत पुढारी वृत्तसेवा

मराठी चित्रपट अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर (mahesh manjrekar) यांनी एका व्यक्तीला मारहाण केल्या प्रकरणी त्यांच्या विरोधात शुक्रवारी रात्री पुणे जिल्ह्यातील यवत पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (case filed against mahesh manjrekar)

अधिक वाचा : पुण्याच्या ‘ससून’मध्ये कोंडला महात्मा गांधींच्या स्मृतींचा श्वास!

याबाबत यवत पोलीस पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्रीच्या वेळी तक्रारदार कैलास भिकाजी सातपुते हे आपल्या कार गाडीने सोलापूरच्या दिशेने जात असताना यवतमधील पाॅवर हाऊसच्या परिसरात पुणे सोलापूर महामार्गावर महेश मांजरेकर यांच्या कारने अचानक ब्रेक लावल्याने कैलास सातपुते यांच्या ताब्यातील कार मांजरेकर यांच्या कारला पाठीमागून धडकली.

अधिक वाचा : पुणे : ‘बर्ड फ्लू’च्या संसर्गाने प्रशासन सतर्क

यावेळी मांजरेकर यांच्या कारचे किरकोळ नुकसान झाले म्हणून महेश मांजरेकर यांनी गाडीमधून उतरून कैलास सातपुते याच्या गालावर चापट मारत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. याबाबत कैलास सातपुते यांनी अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या विरोधात यवत पोलिसांत अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. (case filed against mahesh manjrekar)

अधिक वाचा : करिना कपूर आलिशान घरामध्ये झाली शिफ्ट; तिने शेअर केलेले photos पाहिलेत का?