Mon, Aug 10, 2020 20:47होमपेज › Pune › बारामतीमध्ये कोरोनाचा आणखी एक बळी

बारामतीमध्ये कोरोनाचा आणखी एक बळी

Last Updated: Jul 08 2020 5:11PM
बारामती : पुढारी वृत्तसेवा

शहरातील जळोची भागातील एका ५० वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. बुधवारी (दि.८) ही घटना घडली. जळोचीतील या व्यक्तीला धाप लागणे, अशक्तपणा, न्यूमिनियाची लक्षणे होती. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले होते.

अधिक वाचा : उरुळी कांचनला एका रात्रीत आढळले १० रुग्ण

कोरोनाची लक्षणे दिसून येत असल्याने येथील डॉक्टरांनी त्यांना रुई येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल होण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार या रुग्णास खासगी रुग्णालयातून कोविड केअर सेंटरमध्ये मंगळवारी (दि. ७) दाखल करण्यात आले. तेथे त्यांचा स्वॅब घेण्यात आला. यानंतर त्यांच्या स्वॅब चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. दरम्यान उपचार सुरु असताना बुधवारी त्या रुग्णाचा मृत्यू झाला.

अधिक वाचा : ज्येष्ठ संगीतकार रवी दाते यांचे निधन

बारामती तालुक्यात कोरोनामुळे झालेला हा चौथा मृत्यू आहे. यापूर्वी बारामती शहरातील समर्थनगर भागातील एका ज्येष्ठाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर माळेगाव बुद्रूक येथील लकडेनगर व कोऱहाळे बुद्रूक येथील एका ज्येष्ठाला कोरोनामुळे जीव गमवावा लागला होता. दरम्यान या रुग्णामुळे तालुक्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ३५ वर जावून पोहोचला आहे. 

अधिक वाचा : लॉकडाऊनने प्रश्‍न सुटणार नाही, काळजी गरजेची : चंद्रकांत पाटील