Fri, Oct 02, 2020 00:04होमपेज › Pune › ससूनची नवीन इमारत झाली कोविड-१९हॉस्पिटल

ससूनची नवीन इमारत झाली कोविड-१९हॉस्पिटल

Last Updated: Mar 26 2020 10:14AM

संग्रहित छायाचित्रपुणे : पुढारी वृत्तसेवा

ससूनची नवी 11 मजली इमारत 1 एप्रिलनंतर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या उपचारासाठी वापरली जाणार असून तिचे नामकरण आता 'कोविड- 19 हॉस्पिटल' असे केले आहे. या नवीन हॉस्पिटलमध्ये 7 आयसीयू खाटासह (बेड) 700 नवीन खाटा बसविण्यात येत आहेत. कोरोनाच्या पॉझिटीव्ह रुग्णासाठी युद्धपातळीवर हे रुग्णालय सज्ज करण्यात येत आहे. खासगी रुग्णालयातील तज्ज्ञांसह ससूनचे तज्ज्ञ डॉक्टर येथील रुग्णाचे व्यवस्थापन करतील. याबाबत पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच बैठक झाली असून त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.  

चीनच्या ट्रीटमेंट मॉडेल प्रमाणे आरोग्य सेवा पुरवणाऱ्या स्टाफला संसर्गाचा जास्त धोका न पत्करता कोरोनाच्या रुग्णाचे योग्य व्यवस्थापन करण्याचा उद्देश यामागे आहे. चीनने कोरोनाच्या रुग्णांना विविध रुग्णालयात भरती न करता एकाच रुग्णालयात भरती केले होते. त्यामुळे रुग्णांचे व्यवस्थापन योग्य रीतीने त्यांना करता आले. त्यानुसार खासगी रुग्णालयात कोरोनाचे संशयित रुग्ण दाखल करण्यात येतील आणि तेथून त्यांची चाचणी करण्यात येईल. त्यामध्ये पॉझिटिव्ह आलेले रुग्ण 'कोविड 19 हॉस्पिटल' मध्ये उपचारासाठीे पाठवण्यात येतील, अशी माहिती वैद्यकीय क्षेत्रातील सूत्रांनी दैनिक 'पुढारी'ला दिली.  

कोविड- 19 हॉस्पिटलसाठी प्रशिक्षित मनुष्यबळ लागणार आहे. त्यासाठी अतिदक्षता विभागात इंटेनसिविस्ट, फुप्पूसविकार तज्ज्ञ, डॉक्टर, नर्सेस, या मनुष्य बळाची गरज गंभीर रुग्ण तसेच सर्वसामान्य पॉझिटिव्ह रुग्णांना सेवा देण्यास आवश्यकता पडणार आहे. तसेच व्हेंटिलेटरसह विविध साधनांची गरज पडणार आहे. यासाठी खासगी रुग्णालयांच्या प्रशिक्षित मनुष्यबळाची मदत घेतली जाणार आहे. 

खासगी रुग्णालयांचे सहकार्य हवे

कोविड-१९ हॉस्पिटलसाठी खासगी रुग्णालयांनी स्वयःसेवी वृत्तीने त्यांच्याकडे उपलब्ध असलेले डॉक्टर, चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांची महिती प्रशासनास देण्यात यावी तसेच व्हेंटिलेटर आणि पीपीइ सूटही द्यावेत असाही निर्णय झाला आहे. जर खासगी रुग्णालयांनी स्वयंसेवी वृत्तीने याचा पुरवठा केला नाही तर जिल्हाधिकारी त्यांच्या अधिकारांचा वापर करून हे मनुष्यबळ आणि साधने त्यांच्याकडून उपलब्ध करतील असे या बैठकीत ठरले आहे. 

सध्या नवीन 11 मजली इमारतीमध्ये 7 आयसीयू बेड तयार कराण्यात आले असून या बेडची संख्या 150 पर्यंत वाढवण्यात येणार आहे. तसेच त्यासाठी ऑक्सिजन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. अतिदक्षता विभागाची जसराज नसलेल्या रुग्णासाठी आणखी 500 खाटा तयार आहेत व त्यांची संख्या लवकरच 700 करण्यात येणार आहे. ही इमारत कोरोनाच्या रुग्णासाठी वापरण्यात येणार का याबाबत जिल्हाधिकारी निर्णय घेतील. 
- डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता, ससून रुग्णालय

 


 

 "