Fri, Feb 26, 2021 05:47
कोरोना नियमांचे उल्लंघन; शाही विवाह सोहळा प्रकरणी कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल

Last Updated: Feb 23 2021 11:21AM

पुणे : पुढारी वृत्तसेवा 

हडपसर भागातील मगरपट्टा परिसरात असलेल्या एका लॉनमध्ये शाही विवाह सोहळ्याचे आयोजन केल्याप्रकरणी कोल्हापुरातील भाजपचे नेते आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांच्यासह तिघांविरोधात हडपसर पोलिसांनी सोमवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल केला. 

वाचा : दहावी, बारावीची परीक्षा ऑफलाईन

भादंवि कलम 188, 269, 271 राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व महाराष्ट्र कोव्हिड उपाययोजना 2020 चे कलम 11 अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाचा : ट्रेसिंग, टेस्टिंग, सर्वेक्षण वाढवा : पालकमंत्री सतेज पाटील

कोरोनाचा संसर्ग कायम असताना महाडिक यांच्या मुलाचा विवाह सोहळा हडपसर परिसरातील लक्ष्मी लॉनमध्ये रविवारी पार पडला. या विवाह सोहळ्यास राज्यातील दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली होती. त्यामुळे शाही विवाह सोहळा वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. विवाह सोहळ्याची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. त्यानंतर कोरोनाच्या संसर्गाला अटकाव घालण्यासाठी असलेली नियमावली धुडकावल्याने धनंजय महाडिक यांच्यासह लक्ष्मी लॉनचे मालक विवेक मगर, व्यवस्थापक निरूपल केदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी दिली.

वाचा : जिल्हा बँकेसाठी ८५०० ठराव दाखल