Mon, Nov 30, 2020 12:30होमपेज › Pune › बारामतीत आणखी तीन कोरोनाग्रस्त 

बारामतीत आणखी तीन कोरोनाग्रस्त 

Last Updated: Jul 11 2020 11:19AM

संग्रहित छायाचित्रबारामती : पुढारी वृत्तसेवा 

बारामती शहरात शनिवारी (दि. ११) तिघा रुग्णांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह असे आले. त्यामुळे शहरवासियांच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे. शहरातील जळोची भागातील कोरोनाग्रस्ताच्या कुटुंबातील एका १५ वर्षीय मुलीला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 

अधिक वाचा :  कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात कोरोनाचे नवे ४ रुग्ण

याशिवाय पानगल्लीतील एका ४८ वर्षीय पुरुषाला व वसंतनगरमधील एका ४० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. ही महिला आरोग्य विभागात काम करते.  दरम्यान, बारामती शहर व तालुक्यातील कोरोना रुग्णांचा आकडा आता ४० झाला आहे.