Sat, Aug 08, 2020 11:35होमपेज › Pune › ‘महाविकास आघाडीत कसलीही अस्वस्थता नाही’ (video)

‘महाविकास आघाडीत कसलीही अस्वस्थता नाही’ (video)

Last Updated: Jul 07 2020 8:05PM
पुणे : पुढारी ऑनलाईन

टीका करणे विरोधकांचे काम आहे. पण, तरीही कोरोना संकटाच्या काळात विरोधकांनी टीका-टीप्पणी करो नये. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे काम समाधानकारक आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये कुठलीही अस्वस्थता, नाराजी नाही, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले. पुणे येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वारंवार मातोश्री निवासस्थानी जातात यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीक केली होती. पवार हे आज पुण्यात व्यापारी महासंघाच्या प्रतिनिधींसोबत बैठकीसाठी आले होते. बैठकीनंतर त्यांनी मध्यमांशी संवाद साधत आपल्यावरील टीकेला प्रत्युत्तर दिले.

पवार म्हणाले की, चंद्रकांत पाटलांना काही वाटत असेल तर त्यावर मला काही बोलायचे नाही. तुम्ही वस्तुस्थिती लक्षात घ्या. ज्या मुलाखतीची चर्चा आहे ती मुलाखत देण्यासाठी मी त्याच भागात गेले होतो. तिथून काही अंतरावरच मातोश्री निवासस्थान आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी १४ किलोमीटर लांब माझ्या घरी येण्यापेक्षा मीच त्याच्याकडे गेलो. त्यात मला कमीपणा वाटत नाही, असे स्पष्टीकरण दिले.