Sat, Aug 08, 2020 11:02होमपेज › Pune › कोरोनापासून बचावासाठी चक्क सोन्याचा मास्क 

कोरोनापासून बचावासाठी चक्क सोन्याचा मास्क 

Last Updated: Jul 04 2020 10:23AM
पुणे : पुढारी ऑनलाईन 

कोरोनापासून बचावासाठी बाजारात विविध प्रकारचे मास्क आले आहेत. यामध्ये एन ९५, कापडाचे, मेडिकल युजसाठी मास्क उपलब्ध आहेत. परंतु, एका व्यक्तीने चक्क सोन्यापासून बनवलेला मास्क घातल्याने त्याची सर्वत्र चर्चा होत आहे. 

या व्यक्तीचे नाव शंकर कुराडे असे आहे. ते पुण्यात राहतात. त्यांनी टीव्हीवर एका व्यक्तीला चांदीचा मास्क घातलेला पाहिले होते. त्यानंतर कुराडे यांनी गोल्ड मास्क बनवून घेतला. त्यामुळे शंकर कुराडे यांना गोल्ड मास्क मॅन म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. या गोल्ड मास्कची किंमत २.९ लाख रुपये आहे. याला साडे पाच तोळे सोने लागले आहे.