Wed, Jun 23, 2021 00:47
अखेर आग दुर्घटनेतील मृतदेह नातेवाईकांनी घेतले ताब्यात 

Last Updated: Jun 11 2021 5:04PM

पुणे : पुढारी वृत्तसेवा

मुळशी तालुक्यातील उरवडे येथील औद्योगिक परिसरातील एसव्हीएस अॅक्वा कंपनीता आग दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी डिएनए चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. यामुळे काहीकाळ शवगृह परिसरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नातेवाईकांचे म्हणणे ऐकूण घेतले. त्यावेळी मागण्या मान्य केले जातील, असे आश्‍वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतले.
      
स्मारक नको, अग्नीशमन दल उभारा : प्रविण तरडे

मुळशी तालुक्यातील कंपनीमध्ये झालेल्या जळीत दुर्घटनेत १७ कामगारांना आपला जीव गमवावा लागला. खरं तर काहीतरी आर्थिक मदत घेऊन गप्प बसता आले असते. तसे न करता  मागण्या सरकार समोर मांडण्याचा निर्णय मृतांच्या नातेवाईकांनी घेतला. उपमुख्यमंत्री तथा पलाकमंत्री अजित पवार हे पुण्यातील विधानभवन येथे होते. या ठिकाणी त्यांची भेट घेऊन मागण्या मांडण्यात आल्या.  मागण्या मान्या करण्याचे अश्‍वासन त्यांनी दिले. त्यामुळे हे मृतदेह ताब्यात घेण्यात आले. 

मुळशी तालुक्यात कंपन्या मोठ्या प्रमाणात आहेत. त्याठिकाणी अग्नीशमन दल नाही. या कंपनीला आग लागली त्यावेळी २७ किलो मीटर अतंर पूर्ण करुन अग्नीशमन दलाच्या गाड्या आल्या. त्याच परिसरात अग्नशमन दल असते, तर किमान एका व्यक्तीला तरी आपण वाचवू शकलो असतो.  आता या मृत झालेल्या माहिलांचे स्मारक न बांधता, त्यांच्या नावाने अग्नीशमन दल उभारा, जेणेकरुन भविण्यात आगीच्या घटनेत दुसर्‍या एखाद्या व्यक्तीला आपला जीव गमवावा लगणार नाही.
- प्रविण तरडे, अभिनेता व दिग्दर्शक 

म्हणून मृतदेह ताब्यात घेतले...

आगीच्या दुर्घटनेत ज्यांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी २५ लाख रुपये आर्थिक मदत करावी, कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी द्यावी, ज्या कंपनीला आग लागली, तिला ज्या अधिकार्‍यांनी परवानगी दिली आहे. त्यांना सहआरोपी करा.  मृत्यू झालेल्या महिलांच्या मुलांना मोफत शिक्षण द्या, अशी मागणी करण्यात आली. त्याला उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार व अधिकार्‍यांनी सकारात्मकता दर्शवली आहे. त्यामुळे आम्ही मृतदेह ताब्यात घेत आहोत. 
- भाऊ वाकडे, नातेवाईक.                         

त्या मुलांच्या मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी लागेल 

आगीच्या दुर्घटनेत ज्या महिलांचा मृत्यू झाला, त्या सर्वांचे वय ३० ते ३५ वर्षाच्या आतील आहेत. त्यांची मुलं दहा ते बारा वर्षाच्या आतील आहेत. त्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. त्यांचे आई - वडील म्हणून  पाठीशी उभे रहावे लागणार आहे. वाद पैशासाठी नव्हता, जो काही पैसे मिळतील, ते त्या मुलांच्या भवितव्यासाठी खर्च केले जाईल.
- मधुरा भेळके, अध्यक्ष म्हसोबा देवस्थान थारवडे.