Wed, Oct 28, 2020 11:41होमपेज › Pune › पुणे: डोक्यात फावडे घालून तरुणाचा खून

पुणे: डोक्यात फावडे घालून मामुर्डीत तरुणाचा खून

Last Updated: Sep 29 2020 5:48PM

संग्रहीत छायाचित्रदेहूरोड : पुढारी वृत्तसेवा

देहूरोड परिसरातील मामुर्डी येथे घरात झोपलेल्या तरुणाचा अज्ञात हल्लेखोरांनी झोपेतच हत्या केली. फावडे डोक्यात घालून तसेच गळा चिरून खून केल्याची घटना आज (दि.२९) सकाळी उघडकीस आली. गेल्या तीन दिवसातील खुनाची हि दुसरी घटना असून लागोपाठ खूनाच्या सत्राने देहूरोड हादरले आहे.

मयूर गोविंद गायकवाड ( वय २८, रा. भैरवनाथ मंदिराच्या मागे मामुर्डी ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडला असावा असा संशय देहूरोड पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

घटनेदरम्यान पत्नी मॉर्निंग वॉकसाठी गेली होती. पोलिसांनी तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. घटनास्थळावर पोलिसांना रक्ताने माखलेले फावडे सापडले आहे. दुपारी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. हवालदार आर सी भालेराव यांनी रुद्र प्रताप सिंह या श्वानाच्या मदतीने संशयितांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. 

पोलिसांच्या हाती काही महत्त्वाचे धागेदोरे लागले असून लवकरच या प्रकरणाचा उलगडा होईल असा विश्वास देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी व्यक्त केला.

 "