Thu, Oct 01, 2020 17:45होमपेज › Pune › कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह, तरीही रुग्णाची आत्महत्या 

कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह, तरीही रुग्णाची आत्महत्या 

Last Updated: Aug 08 2020 2:35PM

संग्रहीत छायाचित्रराजगुरूनगर : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाचा अहवाल निगेटीव्ह आल्यानंतरही त्रास होत असलेल्या ६० वर्षीय रुग्णाने तणावाने हाताची नस कापून आत्महत्या केली आहे. ही खळबळजनक घटना पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील राजगुरूनगर शहरात घडली. दिनकर ज्ञानेश्वर जुन्नरकर असे या व्यक्तीचे नाव असून ते शहराच्या बाजारपेठ परिसरात राहत होते.

मयत जुन्नरकर व त्यांच्या पत्नीला कोरोनाचा संसर्ग झाला होता. दोघेही पुण्यातील खासगी रुग्णालयात १५ दिवस उपचार घेऊन चारच दिवसांपूर्वी घरी आले होते. मात्र दोघांच्याही प्रकृतीत सुधारणा होत नव्हती असे सांगितले जात आहे. रुग्णालयात अवास्तव खर्च झाल्यावर आणि एक अहवाल निगेटिव्ह आल्यावर ते घरी राहून काळजी घेत होते. मात्र तरीही त्रास तीव्रतेने जाणवत होता. त्यामुळे शुक्रवारी (दि ७) पुन्हा त्यांचा स्वॅब घेण्यात आला होता. तो आज शनिवारी येणार होता. जुन्नरकर यांना त्रास होत असल्याने घरी डॉक्टर जायलाही धजत होते. त्रास कमी होत नसल्याने जुन्नरकर यांनी शुक्रवारी (दि ७) रात्री ते आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेले होते. त्यांनी त्याच खोलीत हाताची नस धारदार सुरीने कापून घेत आत्महत्या केली. शनिवारी सकाळी मुलगा त्यांना उठवायला गेल्यावर जुन्नरकर रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे निदर्शनास आले. बाजारपेठ परिसरात व शहरात या घटनेने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी खेड पोलिस अधिक तपास करत आहेत.

 "