Tue, Sep 29, 2020 09:51होमपेज › Pune › पुणे : मालमतेच्या वादातून तरुणाचा खून

पुणे : मालमतेच्या वादातून तरुणाचा खून

Last Updated: Dec 10 2019 1:27AM
पुणे : प्रतिनिधी

पुणे येथील विश्रांतवाडी येथे काल रात्री खून झालेल्या युवकाची ओळख पटली असून, तो लोहगाव येथील रहाणारा आहे. मालमतेच्या कारणावरून नात्यातील व्यक्तींनी दगडाने ठेचून मारल्याचे निष्पन्न झाले आहे. 

विवेक उर्फ सोनू पंचमुख (२५, रा.जनार्धन नगर, लोहगाव) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. विश्रांतवाडी पोलिसांनी काही संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. हा प्रकार जुन्या आळंदी रस्त्यावर रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडला. अज्ञात इसमाचा दगडाने ठेचून खून झाला असल्याची माहिती विश्रांतवाडी पोलिसांना मिळाल्यानंतर घटनास्थळी जाऊन पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर त्याचा मृतदेह ससून हॉस्पिटल येथे नेला होता. रात्री साडेबारा वाजता त्यांची ओळख पटली. पंचमुख व त्याच्या चुलत भावाचा जागेवर वाद सुरू होता. या रागातून त्याला विश्रांतवाडी येथे बोलवून घेऊन त्याचा खून केला.

 "