Fri, Sep 25, 2020 18:47होमपेज › Pune › बारामती एमआयडीसीत मजूराचा खून

बारामती एमआयडीसीत मजूराचा खून

Last Updated: Aug 14 2020 5:30PM

संग्रहीत छायाचित्रबारामती : पुढारी वृत्तसेवा

बारामती एमआयडीसीलगत कटफळ येथील कार्डबोर्ड इंडस्ट्रीज मागील हॉलमध्ये मिथुन धीरज मंगता (वय २५, मूळ रा. गोंडा, उत्तरप्रदेश) याचा खून झाल्याची घटना उघडकीस आली. 

पुणे : 'वेळेत उपचार मिळतील याची दक्षता घ्या'

याबाबत तालुका पोलिस ठाण्यात संतोष हवालदार सिंह (मूळ रा. तिरुका बुद्रूक, ता. मनकापूर, जि. गोंडा,  उत्तरप्रदेश) यांनी फिर्याद दिली. शुक्रवार (दि. १३) ते शनिवार (दि. १४) च्या दरम्यान ही घटना घडली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून मिथुन मंगता याच्या डोक्यात रॉड मारुन त्याचा खून केला. मंगता हा बारामती एमआयडीसीतील पुठ्ठा बनविणाऱ्या एका कंपनीत काम करत होता, अशी माहिती तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी दिली. 
 

 "