Wed, Aug 12, 2020 00:31होमपेज › Pune › सारथी संस्‍था बंद पडू देणार नाही : वडेट्टीवार (व्हिडिओ)

सारथी संस्‍था बंद पडू देणार नाही : वडेट्टीवार (व्हिडिओ)

Last Updated: Jul 02 2020 3:55PM
पुणे : पुढारी ऑनलाईन

सारथी संस्‍थेला आवश्यकतेनुसार निधी दिला आहे. यंदाही सारथी संस्‍थेसाठी ५० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच या पुढेही सारथीच्या विद्यार्थ्यांची फेलोशिप सुरू राहील, असे सांगत आम्‍ही सारथी संस्‍था बंद पडू देणार नसल्‍याची ग्वाही आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

आज जिल्‍हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत वडेट्टीवार यांनी सारथी संस्‍थेबद्दलच्या प्रश्नांना उत्‍तरे दिली. यावेळी वडेट्टीवार यांनी सारथीचा जास्‍तीजास्‍त लोकांना कसा फायदा होईल याकडे सरकारचे लक्ष आहे. सारथीव्दारे कौशल्‍य विकासाचा प्रयत्‍न असून, या माध्यमातून जास्‍तीजास्‍त लोकांना रोजगार देण्याचा आमचा प्रयत्‍न आहे. मात्र सध्याच्या परिस्‍थितीमुळे निधी देण्यास उशीर झाला असे सांगत, त्‍यांनी काही लोकांकडून सारथीमध्ये राजकारण करण्याचा प्रयत्‍न चालू आहे. या मंडळींकडून सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्‍न सुरू असल्‍याचा आरोप त्‍यांनी यावेळी केला.