Thu, Oct 01, 2020 23:32होमपेज › Pune › नोकरी कशी मिळवावी व टिकवावी? विषयावर मिडास इन्स्टिट्यूटकडून मार्गदर्शन सत्राचे आयोजन

नोकरी कशी मिळवावी व टिकवावी? मिडास इन्स्टिट्यूटकडून मार्गदर्शन सत्र

Last Updated: Sep 16 2020 1:55PM

मिडास इन्स्टिट्यूटशनिवार दिनांक १९ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून सहभागासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे . आंतरराष्ट्रीय ख्यातीचे करिअर सल्लागार , आय बी एम या कंपनीचे माजी ” कंट्री मॅनेजर” डॉ. भूषण केळकर हे कार्यशाळेला मार्गदर्शन करतील . नोंदणी करण्यासाठी www.midasinstitute.com ला भेट द्या .

पुणे : पुढारी वृत्तसेवा 

कोरोनाच्या महामारीमध्ये आपल्या नोकरी / व्यवसायासाठी लागणारी नवनवी कौशल्ये शिकण्यासाठी वेळ काढणे ही आता काळाची गरज आहे. यंत्रांच्या हाती आपली नोकरी जाऊ नये म्हणून काय करायचे ? आर्टिफिशिअल इंटेलिजन्स कोणाच्या नोकऱ्या घालवणार? नोकरी जाऊ नये यासाठी स्वतः ला रिलेव्हंट कसे बनवायचे? नोकरी मिळवायची असेल तर कोणते स्किल्स आले पाहिजेत? नोकरी मिळवण्याचे व टिकवण्याचे “गुगल ++” मॉडेल म्हणजे काय? याबाबत माहिती घेणे आवश्यक आहे. यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी मिडास इन्स्टिट्यूटच्या वतीने “नोकरी कशी मिळवावी टिकवावी”  विषयावर मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

शनिवार दिनांक १९ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून सहभागासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे करिअर सल्लागार, आय बी एम या कंपनीचे माजी ” कंट्री मॅनेजर” डॉ. भूषण केळकर हे कार्यशाळेला मार्गदर्शन करतील .

नोंदणी करण्यासाठी www.midasinstitute.com ला भेट द्या .या कोर्सची फी १०००/- रुपये असून सवलतीतील फी ६००/- रुपये आहे ( सवलत फक्त पहिल्या काही रजिस्ट्रेशन्स साठी ) त्याचबरोबर कोर्स मध्ये रजिस्टर होणाऱ्या प्रत्येकाला डॉ. भूषण केळकर यांचे “इंडस्ट्री ४.०” हे २०० रुपयाचे पुस्तक भेट म्हणून घरपोच दिले जाईल.

आजूबाजूचा काळ हा सतत बदलत आहे. तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव, जागतिकीकरण यामुळे सतत शिकत राहणे व स्वतः ला अपडेट करत राहत नोकरीमध्ये आपली प्रगती साध्य करणे आवश्यक आहे .यासाठी या कार्यशाळेत सहभागी होण्याचे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

 "