Wed, May 19, 2021 05:51होमपेज › Pune › पवार साहेबांचा अनादर करण्याचा हेतू नव्हता : चंद्रकांत पाटील

पवार साहेबांचा अनादर करण्याचा हेतू नव्हता : चंद्रकांत पाटील

Last Updated: Nov 23 2020 2:07AM

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलपुणे : पुढारी वृत्तसेवा 

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी चंद्रकांत पाटील यांनी टीका केली होती. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज टीका केली. त्याला उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी पवार साहेबांचा अनादर करण्याचा हेतू नव्हता, असे म्हणत सारवासारव केली आहे. ते आपल्या कोथरूड येथील निवासस्थानी माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते. 

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी, माझे कालचे वक्तव्य हे ओबीसी आरक्षणासंदर्भातील होते. पवारांचा अनादर करण्याचा कोणताही हेतू नव्हता. मी माझी बाजू मांडली, माझ्या दृष्टीने हा विषय संपला, त्यांना यावर बोलायचं असेल तर बोलत राहू दे असा टोला अजित पवार यांना मारला. तसेच अजित पवार महाराष्ट्राच्या प्रश्नावर कधी बोलत नाहीत आणि यावर बोलायला त्यांना वेळ कसा मिळाला, असा प्रश्न त्यांनी विचारला. 

चंद्रकांत पाटील यांचे 'ते' विधान म्हणजे विनाश काले विपरीत बुद्धी : अजित पवार 

यावेळी त्यांनी, मला पवार साहेबांबद्दल चुकीचे बोलायचे नव्हते, तुम्ही मोदींवर, अमित शाहांवर बोललेले चालते, देवेंद्र फडणवीस यांना टरबूज्या म्हणतात ते चालते. ते मला चंपा म्हणतात चालते का? असा सवालही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, सरकारमध्ये प्रचंड गोंधळ आहे, शाळांच्या बाबतीत एकमुखाने निर्णय होत नाही. मुलांच्या मनाशी हे सरकार खेळत आहे. जर यावर काही कोणी बोलले तर ट्रोल करण्यासाठी त्यांची पेड टीम तयार असते. अशा ट्रोलर्सला आम्ही घाबरत नसल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले. तसेच ज्यांचा झेंडा एक नाही, ज्यांचे विचार एक नाहीत ते मांडीला मांडी लावून बसले आहेत. हे असे महाराष्ट्राच्या इतिहासात असे पहिल्यांदाच होत असल्याचेही चंद्रकांत पाटील म्हणाले. 

'कोरोनाबाधितांची संख्या पाहूनच पुढचा निर्णय' 

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील कोरोनाच्या दुसरी लाट आणि लॉकडाऊनच्या चर्चेवर भाष्य केले. यावेळी त्यांनी, आर्थिक गाडे उलटे नेण्यात काही अर्थ नाही. काळजी घेऊन हे सर्व सुरूच ठेवावे लागेल. लॉकडाऊन केला तर सर्वच बंद करावे लागेल. त्यामुळे कोरोनासोबत जगताना काही नियम घालून द्यावे लागतील. पण लॉकडाऊन करण्यात काही अर्थ नाही, असे म्हटले. 

पुण्यात कोरोना गर्दीत चेंगरुन मेला की काय ? : अजित पवार

तसेच राज ठाकरे यांच्या विषयी बोलताना, राज ठाकरे हे अतिशय तळमळीने समाजातील प्रश्नावर बोलतात. पण जोपर्यंत ते आपले परप्रांतीत्यांच्या बाबतीतील आपली भूमिका बदलत नाहीत तोपर्यंत त्यांना घवघवीत यश मिळणार नाही, असे म्हटले आहे. राजकारणात त्यांना खूप यश मिळेल. परंतु जोपर्यंत ते परप्रांतीयांच्या बाबतीतली आपली भूमिका बदलत नाही तोपर्यंत त्यांच्यासोबत जाण्याचा प्रश्नच नाही, असेही म्हटले आहे.