Wed, May 19, 2021 06:07
फोनवर दिला पत्नीला तिहेरी तलाक; पतीसह नणंदेवर गुन्हा दाखल

Last Updated: Apr 11 2021 5:01PM

पुणे : पुढारी वृत्तसेवा

शारीरिक व मानसिक छळ करुन विवाहितेला फोनवरच तिहेरी तलाक देण्याचा प्रकार पुण्यात घडला. याप्रकरणी २७ वर्षीय विवाहितेने पतीसह नंणदेविरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पती मजिद इलाही (वय २८) व नणंद झरीना आरिफ लंगरी (वय ३५, रा. सारा अपार्टमेंट, साईबाबानगर, कोंढवा) यांच्‍यावर गुन्‍हा दाखल झाला आहे. 

अधिक वाचा : पुण्यात पूर्ववैमन्यस्यातून चौदा वर्षाच्या मुलावर तलवार, कोयत्याने वार

याबाबत कोंढवा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडित महिला आणि मजिद यांचा विवाह जुलै २०११ मध्ये झाला होता. तेव्‍हापासून पतीसह सासरचे लोक तिचा वारंवार शारीरिक व मानसिक छळ करीत होते. तिला नांदविण्यास नकार देत होते.

 अधिक वाचा : पुणे: रेमडिसीव्हरचा काळाबाजार करणार्‍यास अटक

दरम्यान, फिर्यादी महिला तिच्या माहेरी असताना आरोपी पती मजिद याने पत्नीला फोन करून तिहेरी तलाक दिला. यानंतर पीडितेने आपल्याला न्याय मिळावा, म्हणून पतीसह नंणदेविरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे.