Sat, Aug 08, 2020 14:50होमपेज › Pune › वरिष्ठ अधिकार्‍यांकडून मालमत्तेची लपवाछपवी

वरिष्ठ अधिकार्‍यांकडून मालमत्तेची लपवाछपवी

Published On: Jul 24 2018 1:08AM | Last Updated: Jul 23 2018 11:51PMपुणे : पांडुरंग सांडभोर

महापालिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनीच मालमत्तेची माहिती लपविली असल्याचे समोर आले आहे.  116 अधिकार्‍यांपैकी जवळपास 48 जणांनी गत आर्थिक वर्षातील मालमत्तेचे विवरणपत्र सादर केले नाही. विशेष म्हणजे प्रशासनाने त्यासाठी मुदतवाढ देताना माहिती न देणार्‍यांवर कारवाईचा इशारा दिला होता. त्याकडे अधिकारीवर्गाने दुर्लक्ष केले आहे. 

महापालिकेत कार्यरत असलेल्या प्रथमवर्ग (वर्ग-1) आणि द्वितीय श्रेणीतील (वर्ग-2) अधिकार्‍यांना प्रत्येक आर्थिक वर्षाची म्हणजेच 1 एप्रिल ते 31 मार्चपर्यंतचे त्यांच्या मालमत्तेचे विवरणपत्र आयुक्तांकडे सादर करणे बंधनकारक आहे. अधिकार्‍यांकडून बंद पाकिटात दिली जाणारी ही माहिती गोपनीय ठेवली जाते. पुणे महापालिकेत कार्यरत असलेल्या प्रथम व द्विर्तीय वर्ग श्रेणीतील अधिकार्‍यांची एकूण संख्या 116 इतकी आहे.  मात्र यामधील जवळपास 50 टक्के अधिकार्‍यांनी यावर्षी ही माहिती अद्यापही सेवकवर्ग विभागाकडे सादर केलेली नाही. यामध्ये खाते प्रमुख, सहआयुक्त आणि सहायक आयुक्त तसेच विभाग प्रमुख असलेल्या अधिकार्‍यांचा समावेश आहे.  उपलब्ध माहितीनुसार 2017-18 या गत आर्थिक वर्षाच्या माहिती सादर करण्यासाठी 30 जूनपर्यंतची मुदत दिली होती. मात्र, अनेक अधिकार्‍यांनी ही माहिती न दिल्याने प्रशासनाने पुन्हा 15 जुलैपर्यंतची मुदतवाढ दिली होती. मात्र आता ही मुदत संपल्यानंतर केवळ 68 अधिकार्‍यांनीच ही माहिती सादर केली आहे. उर्वरीत 48 जणांनी मालमत्तेचे विवरणपत्र सादर केलेले नाही.  दरम्यान मालमत्तेचे विवरणपत्र सादरीकरणाच्या मुदतीनंतर अतिरिक्त आयुक्त शीतल उगले यांनी विवरणपत्र सादर न करणारांची वेतन कपात करण्याचे आदेश दिले होते. मात्र, अधिकार्‍यांनी या आदेशालाही केराची टोपली दाखविली असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे. 

मालमत्तेची माहिती न देणारे अधिकारी

श्रीनिवास बोनाला, प्रशांत रणपिसे, किशोर पोळ, मदन आढारी, नामदेव बारापात्रे, सुनील केसरी,  विजयकुमार शिंदे, नरेंद्र साळुंके, युवराज देशमुख, रमेश शेलार, माधव देशपांडे, संध्या गागरे, नितीन उदास, संजय गावडे, युनूस पठाण,  माधव जगताप, राहुल जगताप, मंगेश दिघे, जगदीश खानोरे, सुश्मिता शिर्के, वैभव कडलक, आशिष महाडदळकर, किशोरी शिंदे, चंद्रशेखर अकवारे, महेंद्र शिंदे, नवनाथ निघोट, आर.व्ही.जाधव, सुधीर कदम, इंद्रभान रणदिवे, संजय शेंडे, भारत मोहिते, शिवाजी लंके, श्रीधर येवलेकर, जयंत सरवदे, श्रीकांत वायदंडे, अजित बाबळे, अनंतराव काटकर, रमेश वाघमारे, सुभाष पावरा, विलास फड, अजयकुमार वायसे, सुधीर चव्हाण, ललित बेंद्रे, अमर शिंदे, सुनील यादव, मनीषा शेकटकर, संतोषकुमार कांबळे, मीरा सबनीस.