Tue, Aug 11, 2020 23:46होमपेज › Pune › धनंजय मुंडे बारामतीत शरद पवारांच्या भेटीला

धनंजय मुंडे बारामतीत शरद पवारांच्या भेटीला

Last Updated: Jul 17 2020 7:28AM

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी गुरुवारी बारामतीत खा. शरद पवार यांची भेट घेतली. याप्रसंगी उपस्थित खासदार सुप्रिया सुळे, सदानंद सुळे, प्रतिभा पवारबारामती : पुढारी वृत्तसेवा

कोरोना संकटावर मात केल्यानंतर होम क्वारंटाईन कालावधी पूर्ण करत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी गुरुवारी (दि. १६ रोजी) यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांची भेट घेतली. त्यांनी पवार यांची भेट बारामतीतील त्यांच्या राहत्या घरी गोविंदबागेत घेतली. मुंडे यांचा १५ जुलैला वाढदिवस होता. त्या पार्श्वभूमीवर पवार यांनी मुंडे यांना केक भरवत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

बारावी निकालात यंदा ४.७८ टक्के वाढ, गुणपडताळणीसाठी 'या' कालावधीत करा अर्ज

कोरोनातून मुंडे नुकतेच बाहेर पडले आहेत. त्यानंतर त्यांनी होम क्वारंटाईनचा कालावधीही पूर्ण केला. बुधवारी त्यांचा वाढदिवस साजरा झाल्यानंतर गुरूवारी ते बारामतीत पवारांच्या भेटीला आले. याप्रसंगी खा. सुप्रिया सुळे, सदानंद सुळे, प्रतिभा पवार यांच्या उपस्थितीत मुंडे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. खुद्द शरद पवार यांनी मुंडे यांना केक भरवत शुभेच्छा दिल्या. मुंडे यांनी शरद पवार यांची भेट नेमकी का घेतली? ही भेट नेमकी कोणत्या कारणांसाठी होती? याचा तपशील मात्र मिळू शकलेला नाही.