Mon, Apr 12, 2021 02:52
खंडणी विरोधी पथक नाशिक फाटा येथून वाकडमध्ये स्थलांतरित

Last Updated: Apr 08 2021 6:43PM

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

खंडणी विरोधी पथक नाशिक फाटा येथून वाकडमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. वाकड-हिंजवडी उड्डाणपूलाखाली असलेल्या वाकड चौकीच्या दोन खोल्यांमध्ये पथकाचे कामकाज सुरू करण्यात आले आहे. 

अधिक वाचा : उशाखाली पैसे ठेवून झोपला आणि चोरट्यांचा डल्ला

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पदभार स्वीकारल्यानंतर खंडणी आणि दरोडा प्रतिबंधक विभाग वेगळे केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांच्याकडे दरोडा आणि श्रीराम पौळ यांच्याकडे खंडणी विरोधी पथकाची धुरा देण्यात आली.

कृष्ण प्रकाश यांनी दोन विभाग स्वतंत्र केले. मात्र, कित्येक दिवस या दोन्ही विभागाचे कामकाज नाशिक फाटा येथील एकाच इमारतीतून सुरू होते. दरम्यानच्या काळात दोघांनाही काम करताना अडचणी येत होत्या. त्यामुळे खंडणी विरोधी पथक वाकड येथे स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार नुकतेच वाकड-हिंजवडी उड्डाणपुलाखाली चौकीच्या दोन खोल्यांमध्ये पथकाचे कामकाज सुरू करण्यात आले आहे. खंडणी विरोधी पथकाच्या कामाचा आवाका पाहता येथील जागा देखील कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे खंडणी विरोधी पथकासाठी महापालिकेने प्रशस्त जागा उपलब्ध करून देण्याची गरज आहे.

अधिक वाचा : पुणे : व्यापार्‍यांचे काळ्या फिती लावून आंदोलन

पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या सूचनेनुसार भयमुक्त शहर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पथक कोठून काम करते यापेक्षा काय काम करते हे महत्वाचे आहे. खंडणी संबंधीच्या काही तक्रारी किंवा माथाडीच्या नावाखाली कोणी धमकावत असल्यास नागरिकांनी कसलीही भीती न बाळगता संपर्क साधावा.
- श्रीराम पौळ
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खंडणी विरोधी पथक