Sat, Aug 08, 2020 11:58होमपेज › Pune › पुणे : झेडपी अध्यक्षपदी निर्मला पानसरेंची निवड

पुणे : झेडपी अध्यक्षपदी निर्मला पानसरेंची निवड

Last Updated: Jan 12 2020 1:17AM
पुणे : प्रतिनिधी

पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खेड तालुक्यातील निर्मला पानसरे यांच्या तर उपाध्यक्षपदी भोर तालुक्यातील रणजित शिवतारे यांची आज बिनविरोध निवड झाली.

अधिक वाचा : पुणे : झेडपी अध्यक्ष निवडीवर सदस्यांचा आक्षेप

राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमत असल्याने अध्यक्ष, उपाध्यक्ष राष्ट्रवादीचेच होणार हे निश्चित होते. यावेळी अध्यक्षपद सर्वसाधारण महिला राखीव असल्याने १८ महिला सदस्या इच्छुक होत्या. तर आता काही दिवसांनी इतर विषय समितींच्या सभापतींच्या निवडी केल्या जाणार आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी पक्षाकडून नावांची घोषणा केली होती, त्यानंतर निवडणूक प्रक्रिया पार पडली.

अध्यक्षपदासाठी निर्मला पानसरे आणि उपाध्यक्षपदासाठी रणजीत शिवतरे या दोघांचेच उमेदवारीअर्ज दाखल झाले. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या सर्वसाधारण सभेत या दोघांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. मावळते अध्यक्ष विश्वास देवकाते खेडचे आमदार दिलीप मोहिते जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी निवडीनंतर नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

अधिक वाचा : पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांना पोलिसांकडून धक्काबुक्की

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी खेडच्या निर्मला पानसरे यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी भोरचे रणजित शिवतारे यांची आज सकाळी नावे जाहीर करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी नावांची घोषणा केली.

राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमत असल्याने अध्यक्ष, उपाध्यक्ष राष्ट्रवादीचेच होणार हे निश्चित होते. यावेळी अध्यक्षपद सर्वसाधारण महिला राखीव असल्याने १८ महिला सदस्या इच्छुक होत्या. तर आता काही दिवसांनी इतर विषय समितींच्या सभापतींच्या निवडी केल्या जाणार आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या.

अधिक वाचा : अखेर शरद पवारांच्या फोननंतर पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवडीची घोषणा