Thu, Oct 29, 2020 08:16होमपेज › Pune › 'मराठा आरक्षणासाठी चिंतन बैठक होणार'

'मराठा आरक्षणासाठी चिंतन बैठक होणार'

Last Updated: Sep 25 2020 6:01PM

बाईट : विनायक मेटे - अध्यक्ष, शिवसंग्रामपुणे : पुढारी वृत्तसेवा

मराठा आरक्षण आणि समाजाच्या मागण्यांमध्ये एकवाक्यता असावी यासाठी पुण्यात ३ ऑक्टोबरला चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यापासून मराठा बांधव आक्रमक झाले आहेत. विविध संघटनांकडून ठिकठिकाणी आंदोलन सुरु आहेत. यात मागण्या मांडताना एकवाक्यता दिसून येईना म्हणून चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी सांगितले आहे. यातील निर्णयावर शिवसंग्रामचे भूमिका ठरवली जाईल असे ही यावेळी विनायक मेटे म्हणाले आहे. 

आरक्षणाला घेऊन ओबीसी समाजातील मंडळींकडून अनेक प्रकारची वक्तव्ये केली जात आहेत. त्यातून सामाजिक वातावरण बिघडणार नाही याची काळजी आपण सगळ्यांनी घ्यायची आहे असे आवाहन ही मेटे यांनी केले. शरद पवारांकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत. त्यांनी सर्वांना सोबत घेऊन समाजाला न्याय द्यावा, पण ते का लक्ष देत नाहीत? हे त्यांनाच ठाऊक असा प्रश्न ही मेटे यांनी उपस्थित केला. तर मुख्यमंत्री जोपर्यंत मातोश्रीच्या बाहेर येत नाहीत, तोपर्यंत त्यांना आरक्षणाचे परिणाम, दुष्परिणाम कळणार नाहीत. त्यांनी काही लोकांना एकत्र आणून बैठक घ्यावी अशी आमची भूमिका आहे. मात्र ते काही करत नाहीत, म्हणून आमच्या वर अन्याय होतोय. अशी खंत विनायक मेटे यांनी व्यक्त केली.

अधिक वाचा 

सोने खरेदीची सुवर्ण संधी; दरात मोठी घसरण

कृषी विधेयक रद्द करा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सांगलीत निदर्शने
 

 "