Tue, Sep 29, 2020 18:29होमपेज › Pune › पुण्यातील डॉक्टरचा 'कोरोना'मुळे मृत्यू

पुण्यातील डॉक्टरचा 'कोरोना'मुळे मृत्यू

Last Updated: May 23 2020 12:22PM
पुणे: पुढारी ऑनलाईन

कोरोनाच्या विळख्यात डॉक्टर, नर्स, पोलिस कर्मचारी अडकले आहेत. दरम्यान, पुण्यात कोरोना बाधित असणाऱ्या एका डॉक्टरचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. 

पुणे आरोग्ण अधिकारी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ५६ वर्षीय या डॉक्‍टरांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांची चाचणी ससून रूग्णालयात करण्यात आली होती. त्यानंतर या डॉक्टरवर ससूनमध्येच उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची कोरोनाविरुद्धची झुंज अपयशी ठरली. या डॉक्टरचे शहरात खासगी रूग्णालय आहे. 

यापूर्वी मुंबईतही कोरोनामुळे एका नामांकित डॉक्टराचा मृत्यू झाला होता. मुंबईतील डॉक्टरचा कोरोनाने मृत्यूची होण्याची ती पहिली घटना होती. आता त्यापाठोपाठ पुण्यातही एका खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

पुण्यात कोरोना बाधितांचा आकडा दररोज वाढत आहे. पुणे जिल्ह्यात काल (दि.२२) दिवसभरात सर्वाधिक ३५८ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ५ हजार १६७ वर पोहोचला. पुण्यात आतापर्यंत कोरोनामुळे २५७  रुग्णांचा बळी गेला आहे. पुण्यात आतापर्यंत २ हजार ३७१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 "