Thu, Oct 29, 2020 08:18



होमपेज › Pune › पुण्यात ३ हजार ६६७ नवे रुग्ण ६९  रुग्णांचा मृत्यू

पुण्यात ३ हजार ६६७ नवे रुग्ण ६९  रुग्णांचा मृत्यू

Last Updated: Sep 21 2020 1:28AM




पुणे : पुढारी वृत्तसेवा

पुण्यात आज कोरोनाचे 3 हजार 667  नवे रुग्ण आढळले. त्यामध्ये पुणे शहरातील 1 हजार 700 तर पिंपरी-चिंचवडमधील 749, ग्रामीण  1,218  रुग्णांचा समावेश आहे.  पुणे शहर 38, पिंपरी-चिंचवडमध्ये 8 तसेच ग्रामीणमध्ये 23 अशा एकूण 69 बाधितांचा मृत्यू झाला.

पुणे शहरात रविवारी ‘आरटीपीएस’ व ‘अँटिजेन’ चाचणीसाठी 6,067 संशयितांचे नमुने घेण्यात आले, तर आतापर्यंत 5,74,932 जणांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. आतापर्यंत शहरात एकूण 1,31,781 पॉझिटिव्ह आढळले आहेत. आज दिवसभरात कोरोनातून बरे झालेल्या  1,545 रुग्णांना डिस्चार्ज दिला. तर आतापर्यंत 1,10,916  रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. त्यामुळे सध्या शहरातील विविध रुग्णालयांत 17,781  सक्रिय रुग्णांवर (अ‍ॅक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. त्यापैकी 3,507 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. सध्या 961 रुग्ण गंभीर असून, त्यापैकी 494 अत्यवस्थ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. आता शहरातील एकूण मृतांची संख्या 3,084 वर पोहोचली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचे नवे 749 रुग्ण आढळून आले. आता येथील बाधितांची एकूण संख्या 70 हजार 172 झाली असून, सक्रिय 5 हजार 375 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज 3 हजार 484 नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले. 116 जणांना क्‍वारंटाईन करण्यात आले; तर कोरोनातून बरे झालेल्या 1 हजार 151 रुग्णांना घरी सोडण्यात आले. बरे झालेल्यांची संख्या 59 हजार 968 झाली आहे. चिखली, पिंपरी, निगडी, काळेवाडी, चिंचवड, भोसरी, पिंपळे निलख येथील रहिवासी असलेल्या 8 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. आतापर्यंत मरण पावलेल्यांची संख्या 1 हजार 142 झाली आहे; तर शहराबाहेरील 3 जणांचा मृत्यू झाला आहे. 





 







"