Thu, Oct 01, 2020 17:53होमपेज › None › चक्क राष्ट्रपतींनी 'यासाठी' प्रोटोकॉल मोडला

चक्क राष्ट्रपतींनी 'यासाठी' प्रोटोकॉल मोडला

Last Updated: Dec 10 2019 1:11PM

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि बिरभंद्रसिंहनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

जगात मैत्रीच्या नात्यात पद, उंची, पैसा या सर्व गोष्टींना अनन्य साधारण स्थान असते. तर काहीजण मित्रांसाठी आयुष्य खर्ची घालतात. अशाचप्रकारे एका मैत्रीचे उत्तम उदाहरण सोमवारी (ता.९) पहायला मिळाले. देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी एका कार्यक्रमात गर्दीत आपल्या १२ वर्षांपूर्वी भेटलेल्या मित्राची ओळख पटवली. त्यांनी तातडीने अधिकाऱ्यांना सांगून स्टेजवरील जवळच्या खुर्चीवर बोलावून घेतले. 

ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथील उत्कल विद्यापीठाच्या अमृतमहोत्सव समारंभास राष्ट्रपती रामनाथ कोविंद आले होते. यावेळी लोकांमध्ये त्याचे मित्र बीरभद्र सिंह यांना बसलेले पाहिले. यामुळे त्यानी चक्क मित्रासाठी प्रोटोकॉल विसरला. पांढरी पगडी घातलेले बीरभद्रसिंह यांची ओळख पटल्यावर स्टेजवर बोलवत राष्ट्रपती कोविंद यांनी मित्राला भेटल्याच्या आनंदात त्यांच्याबरोबर फोटो काढले.

दरम्यान, बीरभद्रसिंह हे गर्दीत असतानाही राष्ट्रपतींच्या आदेशाबद्दल आश्चर्य व्यक्त केले. बीरभद्र सिंह यांनी राष्ट्रपती कोविंद यांना गुलाबाचे फूल देण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतू प्रोटोकॉलच्या कारणास्तव देता आले नाही .राष्ट्रपतींनी त्यांना राष्ट्रपती भवनात येण्याचे आमंत्रण दिले आहे.

यावेळी बिरभंद्रसिंह यांनी आपली भावना व्यक्त केली. 12 वर्षानंतर मी राष्ट्रपतींना भेटलो. २००० ते २००७ दरम्यान राज्यसभेचे सदस्य असताना राष्ट्रपती कोविंद यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. 'त्या काळात आम्ही दोघे एसटी / एससी समितीचे सदस्य होतो आणि आम्ही किमान दोन वर्षे एकत्र काम केले.

 "