Thu, Oct 29, 2020 07:04होमपेज › None › भारताचे ३ जवान शहीद, पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन

भारताचे ३ जवान शहीद, पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन

Last Updated: Oct 01 2020 5:51PM
श्रीनगर  : पुढारी ऑनलाईन

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. यात नियंत्रण रेषे जवळ झालेल्या गोळीबारात भारताचे तीन जवान शहीद झाले आहेत. तर पाच जवान जखमी झाले. दरम्यान भारताकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यात आहे. लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असलेल्या सैन्याच्या चौकीवर तोफ उगारत भारताचे तळ नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

लष्कराकडून मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील नौगम सेक्टरमध्ये अचानक पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात दोन जवान शहिद तर चार जखमी झाले. जखमी जवानांना सुखरुप हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान भारताकडून दिलेल्या प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानच्या लष्काराची किती हानी झाली याबाबत अद्याप कळू शकले नाही असे सांगण्यात आले.

यापूर्वी ही  पुंछ सेक्टरमधील शस्त्रसंधीचे उल्लंघन करत पाकिस्तान सैन्याने भारतीय लष्कर तळांवर गोळीबार केला होता. यात एक सैनिक शहीद, तर दुसरा सैनिक जखमी झाला होता. गेल्या आठ महिन्यांत पाकिस्तानकडून ३ हजाराहून अधिक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले आहे. दरम्यान मागील १७ वर्षांत सर्वाधिक आहेत. २००३ साली भारत आणि पाकिस्तान दरम्यान नियंत्रण रेषेवरील युद्धबंदी करारावर स्वाक्षरी केली होती.

 "