Fri, Sep 25, 2020 19:35होमपेज › None › गेल्या चार वर्षात चीनी कंपन्या भारतात मालामाल! बाजारपेठेत तब्बल १ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

गेल्या चार वर्षात चीनी कंपन्या भारतात मालामाल!

Last Updated: Sep 16 2020 8:50AM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

देशातील १ हजार ६०० पेक्षा अधिक भारतीय कंपन्यांना एप्रिल २०१६ ते मार्च २०२० या दरम्यान १ अब्ज डॉलर्सची थेट परकीय गुंतवणूक मिळाली आहे. केंद्र सरकारकडून ही आकडेवारी दिली आहे. काल (दि.१६) मंगळवारी राज्यसभेत लेखी आकडेवारी सादर करण्यात आली.

चीनी कंपन्यांनी भारतीय कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली ही वस्तुस्थिती आहे का? असा सवाल विरोधकांकडून सरकारला करण्यात आला. आकडेवारीनुसार एप्रिल २०१६ ते मार्च २०२० या कालावधीत १ हजार ६०० पेक्षा जास्त कंपन्यांना चीनकडून १०२ कोटी डॉलर्सची परकीय गुतंवणुकीला मदत मिळाली आहे. 

ज्या कंपन्यांना मदत मिळाली आहे त्या कंपन्या ४६ क्षेत्रात कार्यरत असल्याचे समोर आले आहे. ऑटोमोबाइल, पुस्तके छपाई, इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रीक कंपन्याना या कालावधित चीनकडून १० कोटी डॉलरपेक्षा अधिक परकीय गुंतवणूक झाल्याचे समजते आहे.

आकडेवारी नुसार ऑटोमोबाइल क्षेत्रात चीनकडून सर्वात जास्त १७.२ कोटी डॉलर्सची परकीय गुंतवणूक झाली. तसेच सेवा क्षेत्रात १३ कोटी ९६.५ लाख डॉलर्सची परकीय गुंतवणूक झाली. या सगळ्याचे राज्य मंत्री अनुराग ठाकुर यांनी लिखित स्वरुपात माहिती दिली. आम्ही चिनी एजन्सींद्वारे केलेल्या गुंतवणूकीवर लक्ष ठेवत नसल्याचे ठाकुर म्हणाले.

 "