होमपेज › None › 'त्यासाठी' जाधवपूर विद्यापीठावर सर्जिकल स्ट्राईक करावा लागेल!

'त्यासाठी' जाधवपूर विद्यापीठावर सर्जिकल स्ट्राईक करावा लागेल!

Published On: Sep 20 2019 8:11PM | Last Updated: Sep 20 2019 8:11PM

केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांच्यावर हल्ला जाधवपूर (पश्चिम बंगाल) : पुढारी ऑनलाईन 

पश्चिम बंगालमधील जाधवपूर विद्यापीठ (जेयू) येथे डाव्या विचाराच्या विद्यार्थी संघटनांकडून केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांच्यावर हल्ला केला. यावर पश्चिम  बंगाल  भाजपचे अध्यक्ष यांनी जेयूचे कॅम्पस देशविरोधी आणि डाव्या लोकांचा तळ बनला आहे. हे तळ नष्ट करण्यासाठी बालाकोटसारखे 'सर्जिकल स्ट्राइक' करावे लागेल असे वादग्रस्त वक्तव्य केले. गुरुवारी (ता.१९) डाव्या विद्यार्थी संघटनांनी सुप्रियो यांचे कपडे फाडत त्यांचे केसही ओढले. राज्यपाल जगदीप धनकड यांनी तातडीने विद्यापीठ गाठले आणि मंत्र्यांना आपल्या वाहनात घेतले. यावेळी राज्यपालांच्या वाहनालाही विद्यार्थ्यांनी घेराव घातला.

जाधवपूर विद्यापीठात बाबुल सुप्रियो यांनी झालेल्या घटनेबद्दल पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, की तृणमूल कॉंग्रेस सरकारवर टिका केली. माझ्यावर एवढा मोठा हल्ला झाला, पण या सरकारने याबाबत कोणतीच हालचाल केली नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना संपूर्ण तपशीलवार माहिती देणार आहे. 'जाधवपूर विद्यापीठ देशविरोधी आणि कम्युनिस्ट कारवायांचे केंद्र बनले आहे. दरम्यान, अशी घटना प्रथमच घडलेली नाही. आमच्या सुरक्षा रक्षकांनी ज्याप्रमाणे पाकिस्तानमधील अतिरेकी तळ नष्ट केले त्याचप्रमाणे आमचे कार्यकर्ते सर्जिकल स्ट्राईक करून जेयू परिसरातील ही देशविरोधी अड्डे नष्ट करतील.'

विद्यापीठ परिसरातील गर्दीतून सुप्रियोंना वाचवण्यासाठी राज्यपाल जगदीप धनकड विद्यापीठात पोहोचले. राज्यपालांच्या या निर्णयाचे घोष यांनी समर्थन करत म्हटले की, "राज्य सरकार निष्क्रिय बसून सुप्रियो यांच्या हत्येची वाट पाहत आहे." जाधवपूर विद्यापीठाचे कुलगुरू सुरंजन दास यांनी कॅम्पसमधील बिघडलेल्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यास अपयशी ठरल्याने त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली.

पश्चिम बंगालचे भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री बाबुल सुप्रियो गुरुवारी जाधवपूर विद्यापीठात पोहोचले. त्यावर विद्यार्थ्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले. त्यानंतर संतापलेल्या विद्यार्थ्यांनी  घेराव घातला. सुप्रियो हे भाजपाच्या विद्यार्थी संघटना एबीव्हीपीच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी जेयू कॅम्पसमध्ये गेले.