Mon, Sep 28, 2020 08:11होमपेज › None › 'मेड इन इंडिया अंतर्गत व्हेंटिलेटर्सचा पुरवठा'

'मेड इन इंडिया अंतर्गत व्हेंटिलेटर्सचा पुरवठा'

Last Updated: Jul 04 2020 4:13PM
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

मागील काही दिवसांमध्ये ११ हजार ३०० मेड इन इंडिया व्हेंटिलेटर्सचा पुरवठा करण्यात आला. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी आज (ता.४) शनिवारी सोशल मीडियाद्वारे दिली. ११ हजार ३०० पैकी ६ हजार १५४ व्हेंटिलेटर्स प्रत्यक्ष रुग्णालयात बसविण्यात आले असल्याचेही हर्षवर्धन यांनी सांगितले आहे. 

अधिक वाचा :मंगळयानानं टिपलं सर्वांत मोठ्या चंद्राचे छायाचित्र

कोरोना संक्रमणाविरोधात लढा देत असतानाच मेड इन इंडियाला बळ दिले जात असल्याचे सांगून हर्षवर्धन पुढे म्हणतात की, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून १ लाख २ हजार ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा केला जात आहे. यातील ७२ हजार २९३ ऑक्सिजन सिलेंडरचा आतापर्यंत प्रत्यक्ष पुरवठा करण्यात आलेला आहे. याशिवाय ६.१२ कोटी एचसीक्यू गोळ्यांचा पुरवठा करण्यात आला आहे. 

 "