Thu, Oct 01, 2020 19:00होमपेज › None › रोनाल्डोची हॅटट्रिक, पोर्तुगालचा सलग दुसरा विजय

आंतरराष्ट्रीय सामन्यात रोनाल्डोची आठवी हॅटट्रिक

Published On: Sep 11 2019 5:26PM | Last Updated: Sep 11 2019 5:26PM
विल्निअस (लिथुआनिया) : पुढारी ऑनलाईन 
 
युरो चषक २०२० च्या पात्रता फेरी सामन्यात पोर्तुगालने लिथुआनियावर ५-१ गोलफरकाने दणदणीत विजय मिळविला. लिथुआनियामधील विल्निअस येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात स्टार फुटबॉल ख्रिस्तीयानो रोनाल्डोने हॅटट्रिकसह ४ गोल केले. आंतरराष्ट्रीय सामन्यातील त्याची ही ८ वी हॅटट्रिक आहे. तर, क्लब फुटबॉलसह रोनाल्डोच्या कारकीर्दीची ही ५४ वी हॅटट्रिक आहे. पोर्तुगालचा हा सलग दुसरा विजय आहे. मागील सामन्यात त्याने सर्बियाचा ४-२ गोलफरकाने पराभूत केले. होते. पोर्तुगालचा पुढील सामना ११ ऑक्टोबरला लक्झेंबर्गशी होणार आहे. 

आंतरराष्ट्रीय सामन्यात रोनाल्डोने आतापर्यंत ९३ गोल केले असून पोर्तुगालकडून खेळताना त्याने गेल्या २७ सामन्यात ३२ गोल केले आहेत. रोनाल्डोने लिथुआनिया विरुद्ध सामाना सुरुवात झाल्या-झाल्या ७ व्या मिनिटाला पेनल्टीवर पहिला गोल केला. मात्र, ही आघाडी जास्तवेळ टिकली नाही व लिथुआनियाच्या विटाऊटसने २८ व्या मिनिटाला गोल करून १-१ अशी बरोबरी साधली. 

दुसर्‍या हाफमध्ये रोनाल्डो आक्रमक 

दुस-या हाफमध्ये पोर्तुगालने पहिल्या हाफच्या तुलनेत वेगवान खेळ केला. रोनाल्डोची चपळता डोळ्याचे पारणे फेडणारी होती. त्याच्या आक्रमकतेला पोर्तुगालच्या इतर खेळाडूंनीही दिलेली साथ कौतुकास्पद म्हणायला हवी. रोनाल्डोने दुस-या हाफमध्ये आपल्या सहका-याच्या साथीने लिथुआनियावर सामन्याच्या अखेरपर्यंत वर्चस्व राखले. त्याने ६१, ६५ व ७१ व्या मिनीटाला गोल करून संघाला ४-१ ने भक्कम आघाडी मिळवून दिली. सामना संपत असताना इंज्यूरी टाईममध्ये पोर्तुगालच्या विल्यम कारवाल्होने गोल करून संघाची आघाडी ५-१ ने वाढविली. या विजयासह पोर्तुगालचा संघ ग्रुप बीमध्ये दुसर्‍या स्थानावर पोहोचला. युक्रेन प्रथमस्थानी आहे.