Tue, Sep 29, 2020 19:06होमपेज › None › आठ पोलिसांची हत्या करणारा गँगस्टर विकास दुबे एन्काऊंटरमध्ये ठार

आठ पोलिसांची हत्या करणारा गँगस्टर विकास दुबे एन्काऊंटरमध्ये ठार

Last Updated: Jul 10 2020 11:08AM
कानपूर : पुढारी ऑनलाईन

आठ पोलिसांची हत्या करणाऱ्या कुख्यात गुंड विकास दुबे याला कानपूरजवळ एन्काऊंटरमध्ये ठार करण्यात आले आहे. उज्जैनमधून कानपूरला जात असताना पोलिसांच्या वाहनाचा अपघात झाला. या दरम्यान दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दुबे गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. विकास दुबे मारला गेला असल्याची माहिती उत्तर प्रदेश पोलिसांनी दिली आहे. 

सकाळी साडेसहाच्या दरम्यान ही घटना घडली आहे. विकास दुबेला काल मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये अटक करण्यात आली होती. त्याला आज उत्तर प्रदेश पोलिसांचे स्पेशल टास्क फोर्स मध्य प्रदेशातून कानपूरला घेऊन येत होते. यादरम्यान पोलिसांच्या गाडीला अपघात झाला. याचा फायदा घेत दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दुबे मारला गेला. यामुळे दुबेची उत्तर प्रदेशात गेली ३० वर्षाची दहशत संपली आहे.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अपघात झाल्यानंतर पळून जाण्याचा प्रयत्न दुबेने केला होता. यावेळी त्याला मारण्यात आले. याआधी पोलिसांनी दुबेच्या साथीदारांना एन्काऊंटरमध्ये ठार केले आहे.

 

कुख्यात गुन्हेगार विकास दुबेला पकडण्यासाठी गेलेल्या कानपूर पोलिसांवर दुबेच्या टोळीने अंधाधुंद गोळीबार केला होता. या घटनेत ८ पोलिस शहीद झाले. या घटनेने संपूर्ण उत्तर प्रदेश हादरला होता. पोलिसांवर झालेला आतापर्यंतचा हा सर्वात मोठा हल्ला होता. हिस्ट्री सीटर विकास दुबेवर अनेक गुन्हे दाखल आहेत. संपूर्ण उत्तर प्रदेशाला विकास दुबेने हादरवून सोडले होते.
 

 "