Sun, Sep 20, 2020 10:15होमपेज › None › 'तबलीगी जमातचा कार्यक्रम वेळीच रोखण्यात अपयश'

'तबलीगी जमातचा कार्यक्रम वेळीच रोखण्यात अपयश'

Last Updated: May 31 2020 6:42PM

केंद्रीय गृ​हमंत्री अमित शहानवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

राजधानी दिल्लीतील निझामुद्दीन परिसरात असलेल्या तबलीगी जमातच्या मरकजमध्ये आयोजित कार्यक्रम वेळीच रोखून वैद्यकीय मदत देवू केली असती, तर कोरोनाची अशी स्थिती उद्भवली नसती असा सनसनाटी दावा केंद्रीय गृ​हमंत्री अमित शहांकडून करण्यात आला आहे. एका खासगी वृत्तवाहिनीतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

तबलीगी जमातीच्या मरकज मध्ये वर्षभर अशाप्रकारच्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यंदाही आयोजित करण्यात आलेला हा  कार्यक्रम सार्वजनिक नव्हता. कार्यक्रम मरजकच्या इमारतीत आयोजित करण्यात आला होता. पंरतु, वेळीच कार्यक्रम रोखण्यात आला असताना आणि वैद्यकीय मदत दिली असती तर स्थिती बिघडली नसती, असे मत शहा यांच्याकडून व्यक्त करण्यात आले.

२५ मार्चला पहिल्यांदा देशव्यापी लॉकडाउनची घोषणा करण्यात आली होती. पंरतु, पहिल्या लॉकडाउनदरम्यान अनेक घटनांमुळे कोरोनाचा फैलाव झाले. यातील एक तबलीगी जमात मरकच चे प्रकरण होते. दिल्ली, उत्तरप्रदेश सारख्या राज्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढण्यात मरकज आयोजनाला जबाबदारी ठरवण्यात आले होते. त्यावेळी देशातील जवळपास २८ ते ३० टक्के कोरोनाबाधित एकट्या मरकज मध्येच आढळून आले होते.

अनेक राज्यात तबलीगींच्या वैद्यकीय तपासणीसाठी गेलेल्या कोरोना योद्धांवर हल्ले झाले. सरकारने प्रत्येक कोरोना योद्धांसोबत उभी आहे. देशात अश्याप्रकारच्या  ७० ते ८० घटना समोर आल्या आहे. प्रत्येक ठिकाणी कठोर पावले उचलले जातील, असे शहांकडून स्पष्ट करण्यात आले. देशात जेवढ्याही आपत्ती, महारोगराई आल्या त्यांना सर्व सरकारांनी तोंड दिले आहे. प्रत्येकवेळी सरकार परिवर्तन आणते. पंरतु यंदा देश लढत आहे. नागरिकांनी जनता संचारबंदी, थाळी वाजवून कोरोना योद्धांना सन्मानित करून महारोगराई विरोधातील युद्धाला बळ दिले आहे, असे मतही शहांनी व्यक्त केले.

 "