Tue, Aug 04, 2020 11:07होमपेज › National › लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या स्पेनच्या तरुणीने शिकली कन्नड भाषा

लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या स्पेनच्या तरुणीने शिकली कन्नड भाषा

Last Updated: Aug 02 2020 6:53PM
बेंगलोर : पुढारी ऑनलाईन 

जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. भारतातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. देशात मार्चच्या शेवटच्या आठवड्यात लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे परदेशी नागरिकांना भारतातून आपल्या मायदेशी जाण्यात अडचाणी निर्माण झाल्या. यातच स्पेनमधील एक महिला बंगळूरमध्ये अडकली. त्यानंतर तिने शेती व कन्नड भाषा शिकत लॉकडाऊनमधील काळाचा सदुपयोग केल्याचे समोर आले आहे. ही स्पॅनिश महिला व्यवसायाने एक व्यवसायिक डिझाइनर आहे. तिचे नाव ट्रेसा असून ती स्पेनमधील व्हॅलेन्सिया या शहरातून कर्नाटकातील उडुपी येथे आली होती.

वाचा : 'एक देश-एक कार्ड' योजनेत चार राज्यांचा समावेश

जेव्हा भारतात परदेशी उड्डाणे बंद होती तेव्हा ती कन्नड भाषा आणि शेतीची कामे शिकत आहे. ३४ वर्षीय ट्रेसा सेरियानो आता कन्नड भाषा बोलायला शिकली आहे आणि आपल्या मित्राच्या घरी राहून भारताचे वेगवेगळे रुप पाहत आहे.

ट्रेसा म्हणाली की, मला ग्रामीण भागातील जीवन जगण्याची संधी मिळाल्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजते. कोरोना काळात शहरांपेक्षा गावे अधिक सुरक्षित आहेत. येथे मी गायीचे दूध कसे काढाचे व भाताचे पिक कसे लावायचे आणि रांगोळी कशी रेखाटायची हे शिकत आहे. हे सर्व खूप विशेष आहे. माझ्यासाठी हा एक अतिशय विशेष अनुभव आहे.

ट्रेसा म्हणाली की, तिने आपल्या भावाच्या सांगण्यावरून पर्यटनासाठी भारतात जाण्याचा निर्णय घेतला. मी पहिल्यांदाच भारत दौर्‍यावर आली आहे. मात्र येथील अनुभव विशेष ठरला आहे. 

वाचा : लोकशाहीला तडा गेलाय, राहुल गांधींचे केंद्रावर टीकास्त्र