Wed, Jun 23, 2021 02:34
कोव्हॅक्सिन कोव्हिशिल्डपेक्षा इतकी महाग का आहे? 

Last Updated: Jun 10 2021 5:43PM

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : भारतात सध्या कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन लसींचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. त्यातील संपूर्ण देशी बनावटीच्या कोव्हॅक्सिनचा दर हा ऑक्सफर्ड अॅस्ट्रा झेनेकाच्या कोविशिल्डपेक्षा फारच जास्त आहे. भारतात कोविशिल्ड ही ७८० रुपयाला विकणे बंधनकारक आहे. तर रशियाची स्पुत्निक व्ही ची किंमत जवळपास १ हजार १४५ इतकी आहे. पण, कोव्हॅक्सिनचा दर या दोन्ही लसींपेक्षा जास्त आहे. संपूर्ण भारतीय बनवाटीची ही लस आपल्याच देशात  १ हजार ४१० रुपयाला मिळते. ( याच जीएसटी आणि सेवा शुल्क समाविष्ट आहेत.)

कोरोना योद्ध्यांचा लडाखमधील प्रवास

भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनचा दर हा कोविशिल्डपेक्षा दुप्पट आहे. कोव्हॅक्सिन अमेरिकेच्या फायझर लसीची डॉलरमधील किंमती इतक्या किंमतीला भारतात मिळत आहे. कोव्हॅक्सिन लसीमध्ये असे काय आहे ज्यामुळे तीची किंमत ही कोविशिल्डपेक्षा दुप्पट ठेवण्यात आली आहे? 

या प्रश्नाचे उत्तर तज्ज्ञांनी दिले आहे. 

तज्ज्ञांनी कोव्हॅक्सिन ही त्याच्या तंत्रज्ञानामुळे इतकी महाग असल्याचे सांगितले. सेल्युलर आणि मॉसिक्युलर बायोलॉजी केंद्राचे सल्लागार राकेश मिश्रा यांनी सांगितले की, 'कोव्हॅक्सिन तयार करण्याचे तंत्रज्ञान आणि कोविशिल्ड स्पुत्निक लसीचे तंत्रज्ञान हे वेगवेगळे आहे. कॉव्हॅक्सिन निष्क्रीय पूर्ण विषाणू लस तयार करण्यासाठी वापरतो. त्यासाठी शेकडो लिटर महागडे सीरम आयात करावे लागते. त्यात हा विषाणू वाढवला जातो. यासाठी मोठ्या प्रमाणावर काळजी घ्यावी लागते.' 

कोरोना : मृतांच्‍या आकडेवारीत अचानक वाढ कशी झाली? 

मिश्रा पुढे म्हणाले 'कोव्हॅक्सिनची किंमत कोविशिल्ड याच्यापेक्षा दुप्पट असणे मी समजू शकतो. पण, कोविशिल्ड आणि स्पुत्निक व्ही यांच्यातील दरामध्ये असणारा बदल हा व्यावसायिक कारणामुळे असू शकतो. तंत्रज्ञानाच्या दृष्टीकोणातून पहायचे झाले तर एम आरएनए लस ही तयार करण्यास सोपी, स्वस्त आहे. तसेच यासाठी फार उपकरणांची गरज लागत नाही.'

फाझर मॉडर्ना या एम आरएनए तंत्रज्ञानाने तयार करण्यात आलेल्या लसी आहेत. या तयार करण्यासाठी सक्रीय विषाणूची गरज लागत नाही. त्याऐवजी यामध्ये शरिरातील पेशींना धोका न पोहचवणाऱ्या स्पाईक प्रोटीनचे तुकडे प्रेरित केले जाते. हे स्पाईक प्रोटीन कोरोना विषाणूच्या पृष्ठभागावर आढळून येणाऱ्या स्पाईक प्रोटीन असतात. यामुळे आपली विषाणूविरुद्धची प्रतिकार शक्ती वाढते. 

कोविशिल्ड, कोव्हॅक्सिनचे दोन डोस घेतले तरी डेल्टा व्हेरियंटची लागण होतेच 

जर एखादा व्हेरियंटविरुद्ध सध्याची लस प्रभावी ठरली नाही तर एम आरएनए तंत्रज्ञानाने तयार केलेली लस त्वरित या व्हेरियंटला प्रतिकार करण्यास आपल्यात बदल करते. कॉव्हॅक्सिन लसीचे तंत्रज्ञान हे निष्क्रीय विषाणूवर अवलंबून आहे. याचा अर्थ नव्या व्हेरियंटला प्रतिकार करण्यास वेळ लागतो. असे मिश्रा यांनी सांगितले. 

तज्ज्ञांच्या मते सध्या वापरात असलेल्या इतर लसींच्या किंमतीच्या तुलनेत कोरोनाच्या लसींची किंमत ही फार जास्त आहे.  उदाहरण द्यायचे झाले तर पेंटाव्हेलंट लस सीरम, बायोलॉजिकल ई आणि इंडियन इम्युनॉलॉजिकलने जागतिक उपक्रमासाठी १७.३७ रुपयात तयार केली होती. तर सीरमने युनिसेफला गोवर वरील लसीसाठी जवळपास ३० रुपये प्रती डोस आकारले होते. रेबीस वरील लस तयार करण्याचे तंत्रज्ञान हे कोव्हॅक्सिन लसीसारखेच आहे. पण, त्याती किंमत प्रतिडोस २०० रुपये आहे. कोवीड लसीसीठीच्या एका डोसची जीएसटी सोडून १ हजार २०० रुपये किंमत ही जरा जास्तच होते.