Wed, Oct 28, 2020 11:40होमपेज › National › हाथरस प्रकरण : जिल्‍हाधिकाऱ्यांकडून पीडितेच्या कुटुंबियांवर दबाव

हाथरस प्रकरण : जिल्‍हाधिकाऱ्यांकडून पीडितेच्या कुटुंबियांवर दबाव

Last Updated: Oct 01 2020 9:57PM
हाथरस (उत्‍तर प्रदेश) : पुढारी ऑनलाईन 

उत्‍तर प्रदेशच्या हाथरस जिल्‍ह्यात सामूहिक बलात्‍काराची मानुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. या घृणास्‍पद घटनेत पीडितेचा बळी गेला. दरम्‍यान या पीडितेच्या कुटुबियांनी अनेक गंभीर आरोप केल्‍याने जिल्‍हाधिकारीच अडचणीत सापडले आहेत. जिल्‍हाधिकारी प्रवीण कुमार यांच्यावर पीडित मुलीच्या वहिनीने गंभीर आरोप केले आहेत. जिल्‍हाधिकाऱ्यांनी त्‍यांच्या सासऱ्यांना म्‍हणजेच पीडितेच्या वडिलांना जर तुमची मुलगी कोरोनाने मेली असती, तर तुम्‍हाला भरपाई मिळाली असती का? असा प्रश्न विचारल्‍याचा आरोप केला आहे. या सोबतच जिल्‍हाधिकारी आणि पीडितेच्या वडिलांमध्ये झालेल्‍या बोलण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्‍याने प्रशासनावर गंभीर आरोप लावण्यात येत आहेत. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्‍या व्हिडिओमध्ये जिल्‍हाधिकारी पीडितेच्या वडिलांना तुम्‍ही तुमची विश्वसनीयता संपवू नका. हे मीडियावाले काही आज गेले. अर्धे उद्या निघुन जातील. आम्‍ही तुमच्या सोबत आहोत असे बोलने झाल्‍याचे आरोप करण्यात येत आहेत. 

दरम्‍यान या व्हिडिओ सोबतचं पीडितेच्या वहिनीने जिल्‍हाधिकार्‍यांवर आरोप केला आहे. यामध्ये त्‍यांनी तुमची मुलगी कोरोनाने निधन पावली असती, तर तुम्‍हाला भरपाई मिळाली असती का? असा प्रश्न विचारल्‍याचा आरोप केला आहे. आमच्या कुटुंबियांना धमक्‍या मिळत आहेत. हे लोक आम्‍हाला इथे राहू देणार नाहीत. आमच्यावर दबाव टाकला जात आहेत. मात्र मीडियाच्या व्हायरल व्हिडिओवर प्रशासनाकडून मात्र अजून अधिकृत कोणतीही पुष्‍टी करण्यात आलेली नाही.

राहुल आणि प्रियंका गांधी यांना हाथरसला जाताना केली अटक

हाथरस प्रकरणानंतर उत्‍तर प्रदेशचे योगी सरकार बॅकफूटवर गेल्‍याचे दिसून येत आहे. या घटनेनंतर पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी निघालेल्‍या काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेसच्या सरचिटणीस पियंका गांधी यांना अटक करण्यात आली. या दोन नेत्‍यांसोबतच काँग्रेसच्या शेकडो कार्यकत्‍यांना ताब्‍यात घेण्यात आले आहे. 

 "