Sat, Aug 08, 2020 12:20होमपेज › National › पुलवामा: सीआरपीफ तुकडीवर दहशतवादी हल्ला

पुलवामा: सीआरपीफ तुकडीवर दहशतवादी हल्ला

Last Updated: Jul 05 2020 9:26AM
श्रीनगर : पुढारी ऑनलाईन 

जम्मू-काश्मीरच्या पुलमामा येथे केंद्रीय राखीव पोलिस दलावर (सीआरपीएफ) दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. आयईडी स्फोट घडवून आणत दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या गस्ती पथकाला लक्ष्य केले. स्फोटानंतर जवानांनावर गोळीबार करण्यात आला. या मात्र, दहशतवाद्यांच्या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. हल्ल्यानंतर संपूर्ण परिसर भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांनी घेरला आहे.

पुलवामा येथे सर्क्युलर रोड येथे सीआरपीएफच्या जवानांचे पथक गस्त घालत होते. यावेळी दहशतवाद्यांनी आयईडीद्वारे स्फोट घडवून आणला व त्यानंतर गोळीबार केला गेला. सुदैवाने या हल्ल्यात भारतीय सुरक्षा दलाची जीवीतहानी झाली नसल्याचे वृत्त आहे. हल्ल्याच्या घटनेनंतर सीआरपीएफचे उच्च अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. घटनेनंतर संपूर्ण परिसराला घेराव घालण्यात आला असून दहशतवाद्यांचा शोध घतला जात आहे. 

प्रत्यक्षात जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांच्या कारवाईने दहशतवादीना हडबडले आहेत. त्यामुळे ते भारतीय सुरक्षा दलांना लक्ष्य करीत आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये स्थानिक पोलिस आणि सुरक्षा दल दहशतवाद्यांविरूद्ध कारवाई करत आहेत. काश्मीरच्या कुठल्या ना कुठल्या परिसरात दररोज चकमकी घडत आहेत. शनिवारी काश्मीरमधील कुलगाममध्ये सुरक्षा दलांची अतिरेक्यांशी चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले होते.