Thu, Oct 29, 2020 08:04होमपेज › National › शाहीन बागच्या दादी म्हणतात, मोदींनी बोलावलं तर

टाईम मासिकात झळकलेल्या शाहीन बागच्या दादी म्हणतात, पंतप्रधानांनी बोलावलं तर...

Last Updated: Sep 25 2020 5:58PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

नागरिकत्व संशोधन विधेकाविरोधातील आंदोलनाचा दिल्लीतील शाहीनबाग हे केंद्रबिंदू आहे. याच शाहीनबाग आंदोलनातील प्रसिद्ध चेहरा शाहीन बागची दादी म्हणून ओळख निर्माण झालेल्या बिल्किस यांचा टाईम मासिकाच्या जगातील सर्वात प्रभावशाली १०० व्यक्तींमध्ये समावेश करण्यात आला. या समावेशानांतर या दादींनी प्रतिक्रिया दिली.

 बिहार विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर, कोरोना रुग्णांनाही करता येणार मतदान

त्यांनी यावर आनंद व्यक्त करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझ्या मुलासारखे आहेत. जर त्यांनी मला भेटायला बोलावले तर मला त्यांना भेटून आनंद होईल असे सांगितले. बिल्किस यांना जर मोदींनी तुम्हाला भेटण्याचे आमंत्रण दिले तर त्या जाणार का? असे विचारण्यात आले. त्यावेळी त्यांनी 'मी जाणार की यात घाबरण्यासारखी काय गोष्ट आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझ्या मुलासारखे आहेत. मी त्यांच्या आईसारखी आहे. मी मोदींनी टाईमच्या यादीत समाविष्ट होण्यासंदर्भात अभिनंदन करत आहे.' असे वक्तव्य केले.

 सोने खरेदीची सुवर्ण संधी; दरात मोठी घसरण

दरम्यान, टाईम मासिकाच्या १०० प्रभावशाली व्यक्तींमध्ये दादींबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अभिनेता आयुषमान खुराणा यांचाही समावेश आहे. 

 "