Mon, Sep 28, 2020 09:26होमपेज › National › विस्तारवादाचं युग संपलंय; पंतप्रधान मोदींचा लडाखमधून चीनला इशारा

विस्तारवादाचं युग संपलंय; पंतप्रधान मोदींचा लडाखमधून चीनला इशारा

Last Updated: Jul 03 2020 2:36PM
निमू (लडाख) : पुढारी ऑनलाईन 

विस्तारवादाचं युग संपलंय आहे. इतिहास साक्षीदार आहे की विस्तारवादी शक्ती एकतर नष्ट झाली आहेत अथवा त्यांना परत फिरण्यास भाग पाडले गेले आहे, असा स्पष्ट शब्दांत इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनला दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अचानक लेह - लडाखचा दौरा केला. त्यांनी या दौऱ्यात जवानांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न केला. भारत -चीन वादाच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा आहे. यावेळी मोदी यांनी जवानांशी संवाद साधला. यावेळी बोलताना मोदी यांनी, भारतीय जवानांचे साहस अतुलनीय आहे. देशाची रक्षा आपल्या हातात असल्याचे म्हटले. 

लेफ्टनंट हरिंदर सिंह यांच्याकडून परिस्थितीचा आढावा घेतला. सीमेवर तुम्ही तैनात आहात, आम्ही निश्चिंत आहोत. कठीण परिस्थितीत भारत मातेचं संरक्षण जवानांनी केलं, असेही मोदी म्हणाले.

यावेळी मोदींनी जवानांचे कौतुक केले. गलवान खोऱ्यातील शहिदांना श्रध्दांजली वाहत पंतप्रधान मोदी म्हणाले, जवानांच्या बलिदानाने देशाला साहस दिले. जवानांचा पराक्रम, शौर्याचा देशाला अभिमान आहे. हिमालयापेक्षा उंच लष्कराची ताकद आहे. गलवान खोऱ्यात भारतीय जवानांनी शौर्य गाजवलं. देश, जगाच्या प्रगतीसाठी शांतता आवश्यक आहे. संपूर्ण लडाखचा भाग हा भारताचे मस्तक आहे. विस्तारवादानं सर्वात मोठं नुकसान झाले आहे. आता विस्तारवादाचे युग संपलंय आहे, असा इशारा मोदींनी चीनला दिला. 

मोदी यांनी लष्कर, वायूदल आणि आयचीबीपीच्या जवानांना संबोधन केले. विस्तारवाद युग संपलंय, आता विकासवाद सुरू झाला आहे. संपूर्ण जग आता विस्तारवादाविरोधात एकत्र आले आहे, असे ते म्हणाले. 
 

 "