Sat, Aug 08, 2020 12:24होमपेज › National › चिन्यांची ॲप बंद करताच पीएम मोदींनी दिले नवे चॅलेंज!

'त्यामुळे' पीएम मोदींनी दिले नवे चॅलेंज!

Last Updated: Jul 04 2020 8:27PM
नवी दिल्ली :  पुढारी ऑनलाईन

भारताने चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी चीनच्या ५९ ॲपना देशात बंदी घातली. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला आत्मनिर्भर बनवण्याची नवीन योजना तयार केली आहे. तशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरुन दिली. मेड-इन इंडिया ॲप्स वर्ल्ड क्लास तयार करण्यासाठी आज टेक आणि स्टार्ट-अप समुदायामध्ये प्रचंड उत्साह आहे. त्यांच्या कल्पना आणि उत्पादने सुलभ करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान आणि प्रसारण मंत्रालय आणि अटल इनोव्हेशन मिशन हे आत्मनिर्भर भारत ॲप इनोव्हेशन चॅलेंज सुरू करीत आहे. अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन दिली आहे. 

वाचा : अडवलेल्या जेसीबीनेच विकास दुबेचा किल्ला जमीनदोस्त; अलीशान गाड्यांचाही केला चक्काचूर

जर आपल्याकडे असे उत्पादन असल्यास किंवा आपण काहीतरी चांगले करण्याची क्षमता, दृष्टीकोन आहे असे वाटत असल्यास टेक समुदायामध्ये सामील व्हा. असेही पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. 

केंद्र सरकारने चीनचे ५९ ॲपवर बंदी घातली आहे. हे चीनी ॲप भारतात लोकप्रिय होते. त्यामुळे या ॲपची कमाई जास्त होती. सीमेवरील चीनी सैन्यांच्या कुरापती पाहून केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे. भारताच्या या निर्णयाने चीनला जाग आली आहे. बंदी घातलेल्या ॲपमध्ये टीकटॉक व युसी ब्राऊजर हे भारतात लोकप्रीय ॲप होते. 

वाचा : 'मेड इन इंडिया अंतर्गत व्हेंटिलेटर्सचा पुरवठा'