Thu, Oct 01, 2020 18:23होमपेज › National › पुलवामात चकमक; एक दहशतवादी ठार, एक जवान शहीद

पुलवामात एक दहशतवादी ठार, एक जवान शहीद

Last Updated: Jul 07 2020 9:23AM

file photoश्रीनगर : पुढारी ऑनलाईन

जम्मू- काश्मीरमधील पुलवामातील गुसू भागात सुरु असलेल्या चकमकीत एक दहशतवाद्याला ठार करण्यात आले आहे. तर या चकमकीदरम्यान एक जवान शहीद झाले आहेत. पोलिस आणि सुरक्षा दलांनी मिळून ही कारवाई केली आहे. या ठिकाणी अद्याप चकमक सुरु आहे.

पुलवामातील गुसू भागात ३ ते ४ दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलांनी या परिसराची घेराबंदी करत सर्च ऑपरेशन सुरु केले. या दरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. त्याला चोख प्रत्युत्तर देत जवानांनी एक दहशतवाद्याला ठार केले आहे, अशी माहिती काश्मीर विभागीय पोलिसांनी दिली आहे. 

तर या चकमकीदरम्यान एक पोलिस कर्मचारी आणि एक जवान जखमी झाले. जखमी जवान शहीद झाले आहेत. तर पोलिस कर्मचाऱ्यांची प्रकृती गंभीर आहे.

  

 "