Thu, Oct 01, 2020 18:06होमपेज › National › उन्नाव पीडितेच्‍या मृत्‍यूवर मायावतींकडून दु:ख व्‍यक्‍त

उन्नाव पीडितेच्‍या मृत्‍यूवर मायावतींकडून दु:ख व्‍यक्‍त

Last Updated: Dec 07 2019 10:04AM

बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावतीनवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन

उन्नाव येथील बलात्कार पीडितेचा शुक्रवारी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. या घटनेनंतर उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी सोशल मीडियाच्‍या माध्‍यमातून दु:ख व्‍यक्‍त केले आहे. 

उन्नाव येथील बलात्कार पीडितेच्‍या मृत्‍यूनंतर मायावती यांनी ट्वीट करत म्‍हटले आहे की, उन्नाव येथील बलात्कार पीडितेचा  काल रात्री दिल्‍लीत दु:खद निधन झाले. या दु:खाच्‍या प्रसंगात बहुजन समाज पार्टी पीडितेच्‍या परिवारासोबत आहे. यूपी सरकारने पीडितेला न्‍याय देण्‍यासाठी लवकर पावले उचलावीत. लवकर न्‍याय मिळावा हीच जनतेची देखील मागणी आहे.

यासोबतच अशा प्रकारच्‍या दु:खद घटना यूपीप्रमाणेच संपूर्ण देशभरात थांबवण्‍यासाठी राज्‍य सरकारने प्रयत्‍न केला पाहिचे. अशा घटना पाहता केंद्र सरकारने दोषींना कमी वेळेतच फाशीसारखी कठोरातील कठोर शिक्षा देण्‍यासाठी कडक कायदे बनवले पाहिजेत, असे देखील मायावती यांनी ट्वीटमध्‍ये म्‍हटले आहे. 

हैदराबाद सामुहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींचा एन्काऊंटर झाल्‍यानंतर मायावती यांनी हैदराबाद पोलिसांचे कौतुक करत उत्तर प्रदेश आणि दिल्ली पोलिसांनी हैदराबाद पोलिसांकडून काही तरी शिकण्‍याची गरज असल्‍याचे सांगत त्‍यांनी उत्तर प्रदेश सरकारवर सडकून टीका केली होती.

यासोबतच राष्‍ट्रीय महिला आयोग अध्‍यक्ष रेखा शर्मा यांनी काला रात्री सफदरजंग रुग्णालयाला भेट दिली. रेखा शर्मा बलात्कार पीडितेच्‍या नातेवाईकांची भेट घेणार आहेत. 

उन्नाव  बलात्कार पीडित महिलेला गुरुवारी पहाटे आरोपींनी जाळण्याचा प्रयत्न केला होता, त्यात ती ९० टक्क्य़ांहून अधिक भाजल्यानंतर तिला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  काल रात्री ११.४० च्या सुमारास सफदरजंग रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. 

 "