Wed, Oct 28, 2020 11:04होमपेज › National › कायदामंत्र्यांनी शेअर केलं संविधानाच्या 'मुलभूत अधिकार' पानावरील प्रभू रामचंद्रांचे चित्र 

कायदामंत्र्यांनी शेअर केलं संविधानाच्या 'मुलभूत अधिकार' पानावरील प्रभू रामचंद्रांचे चित्र 

Last Updated: Aug 05 2020 11:06AM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

अयोध्येत आज (दि. 5) 12 वाजून 40 मिनिटांनी रामजन्मभूमी मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. या भूमिपूजनासाठी अवघी अयोध्या सजली आहे. दरम्यान, भूमिपूजनाला काही तासच शिल्लक असताना केंद्रीय कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी संविधानाच्या मूळ प्रतीवरील प्रभू रामचंद्र, सीता आणि लक्ष्मण अयोध्येला परतत असणारे चित्र आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले. 

रवीशंकर प्रसाद यांनी या ट्विटरवरील फोटोला 'भारतीय संविधानाच्या मूळ प्रतीवर प्रभू राम, माता सीता आणि लक्ष्मण रावणाचा पराभव केल्यानंतर अयोध्येला पतरत असतानाचे सुंदर चित्र आहे. हे चित्र मुलभूत अधिकारांचे प्रकरण सुरु होते त्या पानावरच आहे. मला वाटले म्हणून तुमच्यासाठी मी हे शेअर करत आहे.' असे कॅप्शन दिले आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी 12.40 च्या दरम्यान रामजन्मभूमी मंदिराचे भूमिपूजन करणार आहे. यावेळी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच आरएसएस प्रमूख संरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह काही मोजकेच मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कोरोना जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. 

 "