Sun, Aug 09, 2020 05:47होमपेज › National › पीएम मोदींच्या 'त्या' गुहेमध्ये बेड,लाईट, शौचालय, सीसीटीव्ही, कॅमेरामन आणि बरचं काही! 

पीएम मोदींच्या 'त्या' गुहेमध्ये बेड,लाईट, शौचालय, सीसीटीव्ही, कॅमेरामन आणि बरचं काही! 

Published On: May 19 2019 3:00PM | Last Updated: May 19 2019 3:00PM
केदारनाथ : पुढारी ऑनलाईन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेचा प्रचार संपल्यानंतर अचुक टायमिंग साधताना तडक केदारनाथ गाठले. पीएम मोदींनी ध्यानस्थ बसण्यापेक्षा त्यांच्यासाठी करण्यात आलेल्या पंचतारांकित सुविधा आणि तेथील हायटेक गुहेवरून बरीच चर्वितचर्वण झाले. 

खडक फोडून तयार करण्यात आलेली ती हायटेक गुहा समुद्र सपाटीपासून १२ हजार फुट उंचीवर आहे. ती गुहा काही नैसर्गिक, तर नाहीच नाही आणि सामान्यही नाही. हायटेक गुहा म्हणूनच तिचा उल्लेख करावा लागेल. खडक फोडून ती गुहा तयार करण्यात आली आहे. या गुहेला लागूनच शौचालय, खिडकी सुद्धा आहे. इतकेच नव्हे, तर पाणी, वीजची सोय करण्याता आली होती. 

शनिवारी (ता.१९) केदारनाथ मंदिरात दर्शन घेऊन तेथील पुनर्विकास योजनांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी त्या गुहेमध्ये ध्यारणा करून रात्र घालवली. मोदींनी दर्शनासाठी गेलो म्हणून केला असला तरी त्यांच्या भेटीपुर्वीच त्यांच्यासाठी पंचतारांकित सुविधा करण्यात आल्या होत्या.  दस्तुरखुद्द मोदीच गुहेत राहणार असल्याने सीसीटीव्ही सुद्धा लावण्यात आले. त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एसपीजी गार्ड यांनी सीसीटीव्ही निरीक्षण केले.