Tue, Sep 29, 2020 19:13होमपेज › National › कोरोना महामारीमुळे केरळने घेतला सर्वांत मोठा निर्णय!

कोरोना महामारीमुळे केरळने घेतला सर्वांत मोठा निर्णय!

Last Updated: Jul 05 2020 6:44PM
तिरुवनंतपुरम : पुढारी ऑनलाईन

देशात कोरोनाचे संकट अधिक गडद होत असताना, केरळ सरकारने नागरिकांसाठी कोविड-१९ पासून वाचण्यासाठी दिशा निर्देश जारी केले आहेत. या दिशा निर्देशांचे एक वर्षापर्यंत पालन करणे जरूरी असल्‍याचे सांगण्यात आले आहे. लोकांनी सोशल डिस्‍टन्सिंगचे पालन करणे, तोंडाला मास्‍क लावणे या सारख्या गोष्‍टींचा या नियमांमध्ये समावेश असून, ज्‍याचे पुढील वर्षभर पालन करावे लागणार आहे. तसेच अशा प्रकारे निर्देश लागू करणारे केरळ हे देशातील पहिले राज्‍य बनले आहे.  

अधिक वाचा : उत्तर प्रदेश : अवैध कारखान्याला लागलेल्या आगीत ७ मृत्यूमुखी

याचा अर्थ कामाच्या ठिकाणी तोंडाला मास्‍क लावावा लागणार आहे. तसेच प्रत्‍येक ठिकाणी सहा फुटापर्यंत सोशल डिस्‍टंन्सिगचे नियम लागू असणार आहेत. या शिवाय लग्‍णसमारंभामध्ये फक्‍त ५० लोकांना उपस्‍थित राहण्याची परवानगी असणार आहे. तसेच अंतिम संस्‍कारासाठी देखील फक्‍त २० लोकांना सामिल होण्याची परवानगी असणार आहे. 

अधिक वाचा : निर्मला सीतारामन यांच्यावर टीका करताना तृणमुल खासदाराची जीभ घसरली

अधिकाऱ्यांच्या लिखीत परवानगी शिवाय कोणत्‍याही सामाजिक सभा, मिरवणू, धरणे, आंदोलन, प्रदर्शने अशा प्रकारांच्या आयोजन केले जाऊ शकत नाही. तसेच परवानगीनंतरही अशा समारंभामध्ये १० पेक्षा अधिक लोक सामील होण्यास मज्‍जाव असणार आहे. भारतात कोरोना विषाणूची पहिली केस केरळमध्येच जानेवारीमध्ये समोर आली होती. केरळमध्ये अजूनही कोरोना संक्रमणाचे ५ हजार २०० पेक्षा अधिक प्रकरणे आहेत. केरळमध्ये आतापर्यंत कोरोनामुळे २५ लोकांचा जीव गेला आहे. तर २,१३१ बाधित रूग्‍णांवर अद्याप उपचार सुरू आहेत. दरम्‍यान ३, ०४८ कोरोनामुक्‍त लोकांना रूग्‍णालयातून डिस्‍चार्ज देण्यात आला आहे. 

अधिक वाचा : प्राप्ती कर परतावा भरण्यासाठी मुदतवाढ

तर, आज (रविवार) सकाळी आरोग्‍य मंत्रालयाने प्रसिध्द केलेल्‍या आकडेवारीनुसार गेल्‍या २४ तासामध्ये देशात २४,८५० कोरोनाची नवी प्रकरणे समोर आली आहेत. तसेच या दरम्‍यान ६१३ लोकांचा मृत्‍यू झाला आहे. तसेच देशात एकुण संक्रमित केसेसची संख्या वाढली असून, ६,७३,१६५ वर पोहोचली आहे. तसेच मृतांचा आकडा १९२६८ इतका झाला आहे. तसेच रूग्‍णांचे बरे होण्याच्या प्रमाणात देखील चांगली वाढ नोंदवण्यात आली आहे. कोरोनातून मुक्‍त होणाऱ्यांची देशभरातील संख्या ४,०९,०८३ वर पोहोचली आहे. 

 "