Thu, Jan 28, 2021 04:18होमपेज › National › आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक ३० नोव्हेंबरपर्यंत बंदच

आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक ३० नोव्हेंबरपर्यंत बंदच

Last Updated: Oct 28 2020 8:49PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

भारतासह जगभरातील कोरोनाचा संसर्ग कमी झाला नसल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक सेवा 30 नोव्हेंबरपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक बंद करण्यात आली होती. ती अजूनही कायम आहे. 

नियमित आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक सेवा बंद असली तरी वंदे भारत व एअर बबल मोहिमेच्या माध्यमातून गरजू प्रवाशांसाठी हवाई वाहतूक चालविली जात असल्याचे हवाई वाहतूक महासंचलनाकडून सांगण्यात आले आहे. भारताने 18 देशांशी एअर बबल करार असून त्यानुसार अमेरिका, ब्रिटनसह इतर देशात हवाई सेवा चालविली जात आहे.